बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Chhattisgarh 31 Ips Officers Transfer Major Police Reshuffle: छत्तीसगड सरकारने पोलिस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पवन देव, एसआरपी कल्लूरी, जीपी सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
CHHATTISGARH: 31 IPS OFFICERS TRANSFERRED IN MAJOR POLICE RESHUFFLE
CHHATTISGARH: 31 IPS OFFICERS TRANSFERRED IN MAJOR POLICE RESHUFFLEsaam tv
Published On

छत्तीसगड सरकारने पोलिस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल मोहीम राबवत तब्बल 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बादल्यांमध्ये अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला असून राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार सर्व अधिकाऱ्यांची पुढील आदेशापर्यंत नव्या ठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलात 1992 बॅचचे IPS अधिकारी पवन देव यांचा विभागही बदलण्यात आला आहे. छत्तीसगडचे पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशन, रायपूरचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांना हटवण्यात आले असून आता त्यांच्याकडे नगरसेना आणि नागरी सुरक्षा विभगाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर 1994 बॅचचे IPS अधिकारी एसआरपी कल्लूरी यांची छत्तीसगड पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

CHHATTISGARH: 31 IPS OFFICERS TRANSFERRED IN MAJOR POLICE RESHUFFLE
9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

जीपी सिंह आणि प्रदीप गुप्ता यांच्याकडे नवी जबाबदारी

वरिष्ठ IPS अधिकारी गुरजिंदर पाल सिंह यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे राज्य पोलिस अकादमीच्या महासंचालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. तसेच प्रदीप गुप्ता यांची पोलिस मुख्यालयात अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

CHHATTISGARH: 31 IPS OFFICERS TRANSFERRED IN MAJOR POLICE RESHUFFLE
IPS Officer Transfer: ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडक्या बदल्या, प्रशासकिय वर्तुळात खळबळ

अतिरिक्त कार्यभार आणि नव्या जबाबदाऱ्या

1997 बॅचचे IPS अधिकारी दीपांशू काबरा यांच्याकडे सध्याच्या जबाबदाऱ्यांसह आतिरिक्त पोलिस महासंचालक आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. विवेकानंद यांना सध्याच्या कामासोबत वित्त, नियोजन आणि व्यवस्थापन विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. अमित कुमार यांच्याकडे सध्याच्या जबाबदाऱ्यांसह अॅंटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. आनंद छाबडा यांच्याकडे तांत्रिक सेवा, डायल 112 आणि दूरसंचार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

CHHATTISGARH: 31 IPS OFFICERS TRANSFERRED IN MAJOR POLICE RESHUFFLE
IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेतही बदल

ओमप्रकाश पाल यांची पोलिस मुख्यालयात पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंकित कुमार गर्ग यांच्याकडे राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 2011 बॅचचे IPS अधिकारी अजातशत्रू बहादूर सिंह यांना नवा रायपूर येथील पोलिस मुख्यालयातील गुप्तवार्ता आणि विशेष शाखेच्या DIG पदावरून हटवण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे नगरसेना, एसडीआरएफ आणि अग्निशमन सेवांचे डीआयजी तसेच संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com