Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Saputra Crime: गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा येथे मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे.
Saputra Crime:
27-year-old youth from Surgana killed in Saputara
Published On

अजय सोनवणे, प्रतिनिधि

मैत्री हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आणि सुंदर नाते असते. खरा मित्र अडचणीच्या काळात पाठीशी खंभीर उभा राहत असतो. परंतु गुजरातमधील एका मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतलाय. डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण गिरिस्थळ सापुतारा येथे बुधवारी मध्यरात्री मित्रांमधील वादातून २७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे.डांग सापुतारा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सुरगाणा शहरातील सहा मित्र सापुतारा येथे बुधवारी ता. २६ रोजी रात्री फिरण्यासाठी गेले होते. यातील चार मित्र आधी सापुतारा येथे आले होते, तर त्यानंतर आणखी दोन मित्र त्यांच्यात सहभागी झाले.

Saputra Crime:
Crime News : बाप की हैवान! ३२ वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, बाभूळगावात खळबळ

बुधवारी रात्री सर्व मित्र सापुतारा येथील संग्रहालयाजवळील बँक ऑफ बडोदा (BOB) ATM परिसरात नाश्ता करण्यासाठी बसले होते. यावेळी गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून तसेच मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या जुन्या वादावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन विकोपास गेला त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या कुणाल परदेशी या युवकाने २७ वर्षीय हेमंत ऊर्फ (विकी) विलास सूर्यवंशी याच्यावर धारदार शस्त्राने पोटाच्या भागात गंभीर वार केले.

Saputra Crime:
Pune Crime: श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट, संतापलेल्या बापाने घेतला जीव; पुण्यातील भयानक घटना

या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.घटनेनंतर हेमंत याला त्याच्या दोन मित्रांनी तातडीने मोटार सायकल वरून पुढील उपचारांसाठी नाशिकच्या वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या हेमंत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. डांगच्या पोलीस अधीक्षक पूजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.के.बारिया आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृणाल किरण परदेशी याला ताब्यात घेतले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य चार संशयित युवकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सापुतारा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्यासह हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com