Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

Pune Police: पुण्यामध्ये बायको आणि मुलासोबत जाणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली. पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं.
Pune Crime:  पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं
Pune Crime News Saam Tv
Published On
  • पुण्यातील भोरमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

  • सारोळा गावात तरुणावर चाकूने सपासप वार

  • पुणे- सातारा महामार्गालगत घडली घटना

  • हत्याकांडाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

सचिन जाधव, पुणे

पुण्याच्या भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा गावात तरुणाची हत्या करण्यात आली. महिला आणि मुलासोबत जाणाऱ्या तरुणावर पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. ज्या महिला आणि मुलासोबत हा तरुण जात होता ती आरोपीची बायको आणि मुलगा होता.

गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित तरुण आरोपीची बायको आणि लहान मुलासह रस्त्याने जात असताना दुसऱ्या एका तरुणाने अचानक मागून येत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोरच्या राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने हत्या करणाऱ्या वक्तीला पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. नंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

Pune Crime:  पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं
Crime: गोळीबाराचा थरार! एकाच कुटुंबातील ८ जणांची गोळ्या झाडून हत्या, नंतर तरुणाने स्वत:लाही संपवलं

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळाहद्दीत वीर रोडवर घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला. आरोपी दीपक मनोहर पाल हा परप्रांतीय आहे. त्याच्या बायकोचे हत्या करण्यात आलेला तरुण अमर पवार यांच्याबरोबर प्रेमसंबंध होते. त्याचा राग मनात धरून दीपक पालने पाठीलाग करत चाकूने वार करून अमर पवारची हत्या केली. दीपकने अमरच्या मानेवर आणि पाठीवर अनेक वेळा वार करून संपवलं. राजगड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Pune Crime:  पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं
Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com