

एकाच कुटुंबातील ८ जणांची गोळ्या झाडून हत्या
नातेवाईक तरुणाने ८ जणांची हत्या करून आयुष्य संपवलं
चार पिढ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ
अमेरिकेतील मोंटाना येथे घडली हत्याकांडाची घटना
अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. नातेवाईक तरुणाने हे भयंकर कृत्य केले. गोळ्या झाडून त्याने एक एक करत ८ जणांना संपवलं. त्यानंतर त्याने देखील आत्महत्या केली. अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील बिलिंग्स शहरात ही हादरवून टाकणारी घटना घडली. आरोपीने ज्या व्यक्तींची हत्या केली ते एकाच कुटुंबातील ४ पिढ्यांमधील सदस्य होते. त्यामध्ये वयोवृद्धांपासून लहान मुलांचा देखील समावेश होता.
मोंटानाच्या बिलिंग्स शहरात हत्या करण्यात आलेले सर्वजण राहत होते. ज्यांची हत्या झाली त्यामध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्री जेवणादरम्यान ही भयंकर हत्याकांडाची घटना घडली. तरुणाने आधी सर्वांना गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. एकाच घरामध्ये ९ जणांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह सापडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
हत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या जेनिफर मर्सर यांनी सांगितले की, मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील ४ पिड्यांचे सदस्य होते. यामध्ये ९० वर्षांच्या आजीपासून ते ७ वर्षांच्या मुलीपर्यंत सर्वांचा समावेश होता. पोलिसांनी सांगितले की, या सर्व जणांना घरी बोलावून घेण्यात आले होते. जेवणानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शेजारच्या नागरिकांना फटाके फुटत असल्यासारखे वाटले. या गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरून गेला.
ज्या घरात ही घटना घडली त्या घराला आग लागण्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी याठिकाणावरून गोळीबाराचा आवाज ऐकला होता. आरोपीने गोळ्या झाडून सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सध्या पोलिस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिस सर्व बाजूने तपास करत मृतांच्या नातेवाईकांचे देखील जबाब नोंदवत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.