कोलकाता: दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यातील बारूईपूर येथे दुर्गापूजा समितीच्या नियंत्रणाच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीत भाजपचे कार्यकर्ते बापी प्रामाणिक (वय 45) यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी स्थानिक स्थानिक निलंबित भाजप नेते सुजन मंडल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबियांच्या आरोपानुसार, सुजन मुंडल यांच्या कटानुसार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बापी यांना घराबाहेर बोलावून त्यांची हत्या केली. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सांगण्यात आले की, सुजन मंडल यांची काही दिवासांपूर्वीच पक्षाने हकालपट्टी केली आहे. ही घटना रविवारी रात्री हरदह रविवारी रात्री ग्रामपंचायत परिसरातील उत्तर टांगेरबेरिया येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूजा समितीचे नियंत्रण कोणत्या गटाकडे राहणार, यावरून दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान बापी प्रामाणिक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजप राज्य समितीचे सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष उत्तम कर यांनी या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. ज्या भाजप नेत्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्याला पक्षातून आधीच काढून टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे भाजप आणि तृणमृल काँग्रेससमध्ये आणखी संघर्ष वाढला आहे.
काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीवेळी देखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या देखील करण्यात आली होती. आशातच निवडणुका होऊन तीन महीने उलटले तरी देखील दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.