'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता लवकरच अडकणार लग्नबंधनात
नुकताच गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा
अभिनेत्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता मोहसिन खानने आपल्या प्रेमाची कबुली देऊन. साखरपुड्याची घोषणा केली आहे. नुकताच त्यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अभिनेता मोहसिन खानने साखरपुड्याचे फोटो टाकत आपल्या जोडीदारासाठी एक खास नोट देखील लिहिलं आहे.
मोहसिन खानने आपल्या गर्लफ्रेंड तमन्नासोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मोहसिन खानने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा सुंदर ब्लेझर घालून आणि लाल रंगाची टाय बांधून लूक पूर्ण केला आहे. तर तमन्नाने लाल रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे. केसांची सुंदर हेअरस्टाइल, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी परिधान करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. दोघे एकत्र खूपच आनंदी दिसत आहे. तमन्ना बोटातील साखरपुड्याची डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
"अल्लाहुम्मा बारिक
हे अल्लाह, ती वेडीपिसी, सुंदर, आत्मविश्वासू आणि संवेदनशील मुलगी, जी नेहमी हसत-खेळत असते, चेष्टा-मस्करी करते, आशा- प्रार्थना करते आणि सतत नाचत-गाजत असते. ती माझ्यासाठी स्वर्गातच लिहून ठेवली होती.
पहिल्यांदा जेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहिलं, जेव्हा पहिल्यांदा मी तुझा हात धरला तेव्हा तू "हम तो भाई जैसे हैं वैसे रहेंगे" गायलास तेव्हा माझ्यात काहीतरी स्थिरावलं होतं. मला माझी व्यक्ती सापडली होती. मला नेहमीच असं सांगितलं जायचं की, जेव्हा तुमचा 'आयुष्याचा जोडीदार' तुम्हाला भेटतो. तेव्हा निर्णय घेणं ही सर्वात सोपी होते...
कदाचित आमची कथा आधीच ताऱ्यांमध्ये लिहिली गेली असेल किंवा कदाचित, आयुष्यात एकदाच दोन लोक एकमेकांना अगदी त्याच क्षणी शोधतात ज्या क्षणी त्यांना एकमेकांची जास्त गरज असते. आमच्या आयुष्याचा हा नवा प्रवास आम्ही एकत्र सुरू करत आहोत. प्रेम, मैत्री आणि आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेला प्रवास... मला तुझा आवडत्या चित्रपटातील एक डायलॉग बोलावासा वाटत आहे, 'मोहब्बत क्या होती है ये तो मै नई जानता, लेकीन इस के लिए दिल से एक दुआ जरूर निकलती है के इसकी आखो मै कभी आसू ना आये' आपण दिलेली सर्व वचने आणि आपण जी स्वप्ने पाहणे बाकी आहे, त्यापैकी कदाचित सर्वात सुंदर 'हे' स्वप्न आहे. ही आपल्या प्रेमाची सुरुवात आहे. तमन्ना..."
अभिनेता मोहसिन खानच्या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी शुभेच्छांचा आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. दोघांना नवीन आयुष्यासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. मोहसिन खान हा टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे खूप जास्त लोकप्रियता मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.