Marathi Actress : "आमचा छोटा राजकुमार आला..."; मराठमोळी अभिनेत्री झाली आई, VIDEO शेअर करत दिली गुडन्यूज

Marathi Actress Welcome Baby : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आनंदाची बातमी दिली.
Marathi Actress Welcome Baby
Marathi ActressSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई

व्हिडीओ शेअर करून दिली गुडन्यूज

मराठी अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच आई झाली आहे. मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ही गुडन्यूज अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा नवरा, शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. सरवणकरांच्या घरी राजकुमाराचे आगमन झाले आहे. समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी आई-बाबा झाले आहेत.

समाधान सरवणकरांची पोस्ट

"आमचा छोटा राजकुमार आला आहे

ईश्वर आणि आपल्या प्रियजनांच्या आशीर्वादाने, आमच्या घरी एका चिमुकल्या राजपुत्राचे आगमन झाले आहे आणि आमची मने आनंदाने भरून गेली आहेत.

हातात घेण्यासाठी एक छोटासा हात,

प्रेम करण्यासाठी एक छोटेसे हृदय,

आणि आयुष्यभर जपण्यासाठी सुंदर आठवणी...

आमच्या घराला एक अत्यंत मौल्यवान भेट मिळाली आहे.

या जगात तुझे स्वागत आहे, आमच्या छोट्या राजकुमारा.

मुलगा झाला आहे! तेजस्विनी-समाधान"

तेजस्विनी लोणारी लग्न

मुलाच्या जन्मानंतर समाधान सरवणकरांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी आणि राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर हे जोडपे ४ डिसेंबर २०२५ रोजी लग्न बंधनात अडकले. तेजस्विनी लोणारी सरवणकरांची सून झाली. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.

Marathi Actress Welcome Baby
Bollywood Actor Wedding : ४ मुलांचा बाप दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्याने ५३ व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ

तेजस्विनी लोणारी करिअर

तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमध्ये काम केले आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून तेजस्विनी लोणारीला खूप लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com