Rajkummar Rao: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता राजकुमार राव यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून घेण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, या पोस्टनंतर त्याला 'मोदी है तो मुमकिन है' या गाण्याचा काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
राजकुमार रावने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, "जेव्हा तरुणांना असे वाटते की त्यांचा आवाज ऐकला जात नाही, तेव्हा समाजाने त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. प्रत्येक आवाजाचा आदर झाला पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा परिस्थिती आणखी बिघडवते. ही वेळ संवाद आणि सहानुभूतीची आहे." त्याच्या या भूमिकेवर काहींनी समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली.
एका युजरने त्याला 'मोदी है तो मुमकिन है' या गाण्यात काम केल्याचा उल्लेख करत, "त्या एका गाण्यामुळे माझ्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर संपला," अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या युजरने लिहिले देखावा नाही केला तर बरं होईल, आणखी एका नेटकऱ्याने लिहीले, तू मोदींसाठी आणखी एक गाण का नाही करत.
या टीकेला उत्तर देताना राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्राम कमेंटमध्ये लिहिले, "मित्रा, मी माझा विवेक कधीच विकू शकत नाही. एखादे गाणे मी कोण आहे, माझी भूमिका काय आहे किंवा माझी तत्त्वे काय आहेत, हे ठरवू शकत नाही. त्यामागील दबावाची तुम्हाला कधीच समजू शकणार नाही. मी नेहमी योग्य गोष्टींच्या आणि माणुसकीच्या मूल्यांच्या बाजूने उभा आहे."
पुढे तो म्हणाला, "जोपर्यंत माझा विवेक स्वच्छ आहे आणि मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे, तोपर्यंत मला इतर कशाचीही चिंता नाही. जे लोक मला जवळून ओळखतात, त्यांना माझी भूमिका माहिती आहे. मला आशा आहे की एक दिवस मी तुमचा आदर पुन्हा मिळवू शकेन. देव तुमचे भले करो." दरम्यान, राजकुमार रावच्या पोस्ट आणि त्याच्या उत्तरामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी आणि कलाकारांवर ठाकण्यात येणाऱ्या दबावाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.