Ayesha Khan Detained: 'धुरंधर' फेम अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Ayesha Khan Detained: धुरंधर फेम आयशा खानला विद्यार्थी आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने संपूर्ण घडलेली घटना सांगितली आहे.
Ayesha Khan Detained
Ayesha Khan DetainedSaam Tv
Published On

Ayesha Khan Detained: 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याचा आरोप आयशाने केला आहे. या संपूर्ण घटनेबाबत तिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आयशा खान म्हणते, "मी रस्त्यावर शांतपणे उभी होते. मी एक शब्दही बोलले नव्हते आणि आंदोलनालाही सुरुवात झाली नव्हती. तरीही पोलिसांनी मला आणि माझ्या मैत्रिणींना ताब्यात घेतले." तिच्या या वक्तव्यानंतर या कारवाईवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करण्यात येत आहे.

Ayesha Khan Detained
Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लाडका अभिनेता आता रुपेरी पडद्यावर; 'द्विधा' चित्रपटात साकारणार खास भूमिका

दरम्यान, आणखी एका व्हिडिओमध्ये महिला पोलीस कर्मचारी आयशा खानला पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिसतात. यावेळी आयशा विरोध करत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. व्हॅनमध्ये बसल्यानंतर ती पोलिसांना म्हणते, "तुम्ही मला कुठे नेत आहात? माझ्या कुटुंबीयांना मी काय सांगू?". मात्र, या प्रश्नांवर पोलिसांकडून कोणतेही उत्तर देत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

Ayesha Khan Detained
Arijit Singh: अरिजित सिंगने प्लेबॅक सिंगिंगमध्ये खरंच केलं कमबॅक? 'आवारापन २'मधील 'ये आवारापन' गाण्यामुळे चर्चांना उधाण

यानंतर आयशाने आणखी एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली. ती म्हणाली की, "मी सध्या वरळी पोलीस ठाण्यात आहे. विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी दुपारी चारच्या सुमारास दादर येथे पोहोचले होते. त्यावेळी एका अधिकाऱ्याने मला आंदोलन करता येणार नसल्याचे सांगितले. मी त्यांना पर्यायी मार्ग सुचवण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी माझ्या भावाला आणि मैत्रिणींना ओढत नेले आणि आम्हा सर्वांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून वरळी पोलीस ठाण्यात आणले." या संपूर्ण प्रकरणावर अद्याप मुंबई पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com