Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आरोपी समाधान मुंडेच्या आईची पोलिस ठाण्यात धाव; म्हणाल्या- 'माझ्या मुलाला अडवून...'

Shivraj Divate Case: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातला आरोपी समाधान शिंदेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. समाधान मुंडेला काही तरुणांनी मारहाण केली होती.
Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आरोपी समाधान मुंडेंच्या आईची पोलिस ठाण्यात धाव; म्हणाल्या-  'माझ्या मुलाला अडवून...'
Beed CrimeSaam Tv
Published On

बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाला नवे वळण आले आहे. या प्रकरणातला आरोपी समाधान मुंडेला देखील काही तरुणांनी भररस्त्यात केसाला धरून बेदम मारहाण केली होती. जलालपूरमध्ये ही घटना घडली होती. आता या प्रकरणी समाधान मुंडेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर समाधान मुंडेला मारहाण केल्याप्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळे यांच्यासह इतर ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात परळी शहर पोलिस ठाण्यात भागवत साबळे आणि सुरेश साबळे यांच्याविरोधात समाधानच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडेला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आरोपी समाधान मुंडेंच्या आईची पोलिस ठाण्यात धाव; म्हणाल्या-  'माझ्या मुलाला अडवून...'
Beed Crime: हाणा याला हाणा आता...; शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या मुंडेला गावकऱ्यांनी केसाला धरून तुडवलं| VIDEO

समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरीला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे आणि सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारहाण केल्याची तक्रार समाधानच्या आईने दिली होती. या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आरोपी समाधान मुंडेंच्या आईची पोलिस ठाण्यात धाव; म्हणाल्या-  'माझ्या मुलाला अडवून...'
Beed: ट्रॅक्टरवरून वाद टोकाला! ५ जणांना कुऱ्हाड, लाठ्या अन् दगडानं ठेचलं; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

दरम्यान समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी हे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी असून आता या दोघांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दरम्यान, परळीच्या लिंबोटा येथे राहणाऱ्या शिवराज दिवटे या तरुणाचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पेट्रोल पंपासमोरून अपहरण करण्यात आले होते.

जलालपूर भागातील डोंगरपट्ट्यात असलेल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन १० ते १५ जणांच्या टोळीने या तरुणाला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिवराज दिवटे या तरुणाला ही मारहाण केली होती.

Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आरोपी समाधान मुंडेंच्या आईची पोलिस ठाण्यात धाव; म्हणाल्या-  'माझ्या मुलाला अडवून...'
Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, समाधान मुंडेला भरचौकात बेदम मारहाण| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com