Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क

Mumbai Police: मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी आली आहे. विमानतळ पोलिसांना धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.
Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क
Mumbai Airport And Taj Mahal Hotel Saam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलिस ठाण्याला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल येताच मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी विमानतळ पोलिस ठाण्यात धमकीचा मेल आला. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरू आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक रित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आला आहे.

Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क
Mumbai Tourism : सुट्टी संपण्याआधी मुंबईजवळ प्लान करा छोटी ट्रिप; ट्रेकिंग-कॅम्पिंग-बोटिंग सर्वकाही एकाच ठिकाणी अनुभवाल

धमकीचा मेल येताच यंत्रणा सतर्क झाली आहे. viduthalai_puli_vellum नावाचा ईमेल आयडीवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. ईमेल आयडीच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१(१) (३) (४) आणि ३५१ (१) ख अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क
Mumbai-Thane : घोडबंदरच्या ट्रॅफिकला बाय बाय, मुंबई-ठाणे आणखी जवळ, अंतर २५ मिनिटांनी कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com