Beed: ट्रॅक्टरवरून वाद टोकाला! ५ जणांना कुऱ्हाड, लाठ्या अन् दगडानं ठेचलं; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

Tractor Dispute Turns Violent in Beed: बीड जिल्ह्यातील अमळनेर भागात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे.
 Crime
Crimesamm tv
Published On

बीडमध्ये सध्या गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच बीडच्या अमळनेरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उभ्या पिकात ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच वादातून कुऱ्हाड, लाठ्या - काठ्या आणि दगडाने जणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली. 'उभ्या पिकात ट्रक्टर का घातली?' हा प्रश्न विचारल्यामुळे पाच जणांनी मिळून पाच जणांना बेदम मारहाण केली आहे. कुऱ्हाड, लाठ्या - काठ्या आणि दगडाने हल्ला करत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन वृद्धांसह एकूण पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Crime
BJP: भाजपच्या बड्या नेत्याला हॉस्पिटलमध्ये मारहाण; ज्युनियर डॉक्टरांनी बेदम मारलं, महिला डॉक्टरांशी असभ्य वर्तन..

या घटनेनंतर वर्षा मिसाळ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. वर्षा मिसाळ यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नितीन सानप, कृष्णा मिसाळ, आजिनाथ मिसाळ, आप्पासाहेब मिसाळ आणि अलका मिसाळ या पाच जणांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Crime
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार, खात्यात ₹२१०० येणार; शिंदे गटातील नेत्यानं स्पष्टच सांगितलं

या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com