BJP Leader : गर्लफ्रेंडसोबत अश्लील VIDEO बनवायचा, नंतर बायकोला दाखवायचा; भाजप नेत्याच्या मुलाच्या १३० व्हिडिओंची संपूर्ण स्टोरी

Mainpuri Shubham Gupta Video : मैनपुरी येथील भाजप महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असा दावा केला जात आहे की सुमारे १३० व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
mainpuri Shubham Gupta Video Scandal
mainpuri Shubham Gupta Video ScandalSaam Tv News
Published On

मैनपुरी : सध्या उत्तर प्रदेशमध्यये मैनपुरी जिल्ह्याची खूप चर्चा होत आहे. मैनपुरीच्या माजी भाजप नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचे मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात शुभम गुप्ताची पत्नी शीतल गुप्ता यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. शीतल गुप्ता यांनी शुभमवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. दुसरीकडे, शुभम गुप्ताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेनंही या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी येथील भाजप महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असा दावा केला जात आहे की सुमारे १३० व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ अत्यंत अश्लील असल्याचं वर्णन केलं जात आहे. व्हायरल झालेले व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला देखील शहरातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

mainpuri Shubham Gupta Video Scandal
Crime Diary : ५०० पानांची चार्जशीट, ९७ साक्षीदार, रिसॉर्टवर स्पेशल सर्व्हिसच्या नावाखाली हत्या, Ankita Bhandari मर्डर केसचा मोठा निकाल

शुभमचा त्याच्या पत्नीशी वाद सुरू आहे

शुभम गुप्ता याचे २०२१ मध्ये शीतल गुप्ता हिच्याशी लग्न झाल्याचं समोर आलं आहे. पत्नी शीतल गुप्ता यांनी पती शुभम गुप्ता याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचा आरोप आहे की, 'तिचा पती शुभमने तिला सिगारेटने चटके दिले होते, तेव्हा तिनं पोलिसांनाही बोलावलं होतं. पण हे प्रकरण मिटवण्यात आलं'. शीतलचा आरोप आहे की, 'शुभम त्याच्या मैत्रिणीसोबत अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि ते तिला दाखवायचा आणि नंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा'.

शीतल गुप्ता यांचा आरोप आहे की शुभम गुप्ता तिला 'माझी आई भाजप नेता आहे' असं म्हणत धमकावत असे. तिचा मोठ्या नेत्यांशी संपर्क आहे. कोणीही मला काही करू शकणार नाही, मी जे काही करेन ते करेन.' पत्नी शीतल गुप्ता यांनी त्याच्यावर घरात डांबून ठेवल्याचा आणि उपाशी ठेवल्याचा आरोप केला आहे. शीतलच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती शुभम गुप्ता आणि सासू सीमा गुप्ता यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

mainpuri Shubham Gupta Video Scandal
Crime : वहिनीने आंबे तोडले, दीराच्या डोक्यात तिडीक गेली; धारदार शस्त्रानं शीर धडावेगळं केलं; अन्...

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेनं शुभमची पत्नी शीतल गुप्तासह ३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तिची प्रतिमा मलिन झाली आहे.

mainpuri Shubham Gupta Video Scandal
Abbas Ansari: प्रक्षोभक वक्तव्य भोवलं! अब्बास अन्सारींना डबल दणका, आमदारकी जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com