Crime : वहिनीने आंबे तोडले, दीराच्या डोक्यात तिडीक गेली; धारदार शस्त्रानं शीर धडावेगळं केलं; अन्...

Crime News : घरगुती कलहामुळे एका व्यक्तीने त्याच्या वहिनीची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने महिलेचे शीर कापले. ते शीर आणि धारदार शस्र घेऊन आरोपी रस्त्यावरुन फिरत होता. रस्त्यावरुन फिरत असतानाचा आरोपीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Crime News
Crime Newsx
Published On

सोशल मीडियावर एक भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका हातात धारदार शस्त्र आणि दुसऱ्या हातात महिलेचे शीर घेऊन रस्त्याच्या कडेने फिरत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातला असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भरतगड परिसरात एका व्यक्तीने किरकोोळ वादातून वहिनीची हत्या केली. तिचे शीर कापले आणि एका हातात ते शीर, तर दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेऊन आरोपी उघडपणे फिरत राहिला. आरोपीचे नाव विमल मंडल, तर मृत महिलेचे नाव सती मंडल आहे अशी माहिती समोर आली आहे.

Crime News
लग्नासाठी मुली दाखवू, सिंधुताई सपकाळ संस्थेच्या नावाने फसवणूक; आमिष दाखवून मुलांच्या कुटुंबांकडून हजारो रुपये लुबाडले

कौटुंबिक वादातून विमल मंडलने संतापून वहिनीची हत्या केली, त्यानंतर धारदार शस्त्राने तिचे शीर कापले. झाडावरील आंंबे तोडण्यावरुन हा वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. आंबे तोडल्याच्या कारणामुळे आरोपीने महिलेचा खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या हत्येमागे काही जुने कौटुंबिक कलह असल्याचा पोलिसांना संशय आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime News
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

वहिनीचे शीर घेऊन फिरत असल्याने लोकांनी आरोपीला पाहिले आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विमल मंडलला अटक केली. वहिनीचे शीर आणि शस्त्र घेऊन मी स्वत: पोलिस ठाण्यात येत होतो असे आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. आंबे तोडण्यावरुन झालेला वाद हा हत्येमागील कारण असल्याचे म्हटले जात आहे.

Crime News
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com