Sindhutai Sapkal
Sindhutai Sapkal x

लग्नासाठी मुली दाखवू, सिंधुताई सपकाळ संस्थेच्या नावाने फसवणूक; आमिष दाखवून मुलांच्या कुटुंबांकडून हजारो रुपये लुबाडले

Sindhutai Sapkal Foundation च्या नावाचा वापर करुन काहीजण लोकांची फसवणूक करत आहेत. लग्नाचे आमिष दाखवत लग्नाळू मुलांकडे पैसे उकळले जात आहेत. सिंधुताई यांच्या कन्या ममता सिंधुताई यांनी फेसबुक पोस्ट करत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
Published on

लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रासह भारतभर अशा फसवणूकीच्या घटना घडत आहेत. ज्यांची लग्न ठरत नाही अशांना टार्गट करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सध्या अस्तित्त्वात आहेत. या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवत लोकांकडून पैसे उकळतात. खोट्या नावांचा वापर करुन फसवणूक केली जाते.

Sindhutai Sapkal
Snake Under Pillow : बाप रे बाप, उशीखाली आढळला भला मोठा साप; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल

पोलीस, सरकारी अधिकारी अशी खोटी ओळख दाखवून देखील फसवणूक केली जाते. तर काहीजण मोठ्या संस्थांच्या नावाचा वापर करुन लोकांना गंडा घालतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंधूताई यांच्या कन्या ममता सिंधूताई यांनी फेसबुकवर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. लोकांना फसवणूकीपासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

Sindhutai Sapkal
Video : मुंबईने गुजरातला हरवलं अन् आशिष नेहराच्या मुलांना धक्का बसला; धाकटा ढसाढसा रडला, तर लेकीने अश्रू लपवले

ममता सिंधूताई यांनी पोस्टच्या सुरुवातीला 'माई, पद्मश्री डॉ सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत अस भासवून, त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून आपल्या मुलांसाठी मुलगी शोधत असणाऱ्यांची फसवणूक करणार्याच्या सध्या मी शोधात आहे. दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत त्यांना कशाचीही भिती का बरे वाटत नसेल?' असे म्हटले.

Sindhutai Sapkal
Maharashtra Politics : अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार का? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

'मध्यंतरी मी, दीपक दादा व विनय, आम्ही एक व्हिडिओ करून त्या द्वारे सध्या संस्थेत लग्नासाठी मुली नाहीत हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. आम्ही पोलिसांची मदत सुद्धा घेणार आहोतच. पण त्याचबरोबर ठराविक काळाने ह्या पोस्ट सोशल मिडियावर टाकत राहणार आहोत' असे ममता म्हणाल्या.

Sindhutai Sapkal
Shocking News: तो प्रवास अखेरचा ठरला! समोरच्या कारचालकानं ब्रेक दाबला अन् अनर्थ घडला, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुळात आजवर आमच्या संस्थामध्ये जितके विवाह पार पडले ते जणू घरातली लेकबाळ सासरी जाते आहे या हेतूनेच तिची रीतसर पाठवणी केली गेली आहे.त्यासाठी आम्ही मुलाकडून एक पैसा घेतलेला नाही. आणि या जाहिराती बघाल तर त्यात पैशाच्या बदल्यात केवळ आमिष दाखवलेलं दिसून येत आहे. आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीयेत. कारण ज्या आहेत त्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणारच नाही. अजून किमान तीन वर्षे तरी संस्थेत लग्न नाही. आणि हेच आम्ही दररोज आम्हाला येणाऱ्या फोनवर सांगत असतो. अशा वेळी सुंदर मुलींचे फोटो दाखवून जर लग्नासाठी मुलगी हवी असेल तर आधी गेट पास काढा आणि त्यासाठी पंधरा हजार ऑनलाइन भरा अस सांगणारे विकृतच म्हणू नये तर काय म्हणावं. आधीच समाजातील मुलींची संख्या कमी असताना, नवर्या मुलासाठी मुलगी मिळत नसताना अशा हवालदिल आईबापांच्या मनस्थितीचा फायदा उचलणारे किती नीच मानसिकतेचे असतील याची कल्पना न केलेलीच बरी, असे ममता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

...म्हणूनच ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी आहे. - ममता सिंधूताई

माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या कृत्यांना वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक यापुढेही होत राहील.

माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या आसपास जर कोणी अशा पद्धतीने कुणाची फसवणूक करत असेल तर तो प्रकार लगेच उघडकीस आणा. संस्थेशी संबंधित संपर्क नं आहेत त्यावर कळवा. खात्री करून घ्या. आणि अशा भूलथापांना बळी पडू नका. सोबत स्क्रीनशॉट जोडले आहेत. गेल्या चार दिवसात बऱ्याच ठिकाणाहून मला हे स्क्रीनशॉट आले आहेत. यामध्ये जे मोबाईल नं आहेत त्यावर मी फोन करून झाले आहे. सुरुवातीला मलाही हा सिंधुताई सपकाळांचा महिलाश्रम आहे असं सांगण्यात आलं. जेंव्हा मी त्यांचीच मुलगी बोलते आहेत म्हणाले तेंव्हा फोन कट केलाय. माझ्याकडे ते ही रेकॉर्डिंग आहे.

Sindhutai Sapkal
Video : लज्जास्पद! भारताला शिव्या देणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे दुबईत भारतीयांकडून स्वागत? केरळ समुदाय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com