Crime Diary : ५०० पानांची चार्जशीट, ९७ साक्षीदार, रिसॉर्टवर स्पेशल सर्व्हिसच्या नावाखाली हत्या, Ankita Bhandari मर्डर केसचा मोठा निकाल

Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंडची अंकिता भंडारी, जिची वयाच्या १९व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. अंकिता पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर येथील खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट होती.
Ankita Bhandari Murder Case
Ankita Bhandari Murder CaseSaam Tv News
Published On

डेहराडून : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वारच्या दिवाणी कोर्टानं मोठा निकाल दिला आहे. कोर्टानं मुख्य आरोपी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा खटला सुमारे दोन वर्ष आणि आठ महिने कोर्टात चालला. कोर्टानं मान्य केलं की तिन्ही आरोपींनी मिळून अंकिताची हत्या केली आणि तिचा मृतदेह लपवण्याचा कट रचला. शिक्षा सुनावल्यानंतर, तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

उत्तराखंडची अंकिता भंडारी, जिची वयाच्या १९व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. अंकिता पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर येथील खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट होती. या घटनेत काही व्हीआयपींचीही नावं चर्चेत होती. या हाय प्रोफाइल प्रकरणात अनेक ट्विस्ट आले. या प्रकरणात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं, ९७ साक्षीदार होते, ज्यापैकी ४७ साक्षीदारांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. त्यानंतर घटनेच्या दोन वर्षांनी तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. पुलकित आर्यच्या मालकीच्या वंतारा रिसॉर्टमधून १८ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिता अचानकपणे बेपत्ता झाली. नंतर तिचा मृतदेह कालव्यात सापडला होता. या प्रकरणातील आरोपी पुलकित आर्यवर आयपीसी कलम कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले होते. त्याचवेळी, इतर दोन आरोपींवरही खून आणि अनैतिक कृत्यांमध्ये सहकार्य केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.

Ankita Bhandari Murder Case
५ लाख द्या अन्यथा...; सूनेला अंगावरील कपड्यांवर हाकललं, ६० दिवसाच्या आतच नवविवाहितेला...

ऋषिकेशजवळील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी १९ वर्षीय अंकिता १८ सप्टेंबर २०२२ रोजी अचानक गायब झाली होती. पाच दिवसांनंतर, २४ सप्टेंबर रोजी, अंकिताचा मृतदेह ऋषिकेशजवळील चिल्ला कालव्यात सापडला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर, रिसॉर्ट मालक पुलकित आर्यने ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा अंकिताला गायब करण्यात, तिची हत्या करण्यात आणि तिचा मृतदेह कालव्यात फेकण्यात पुलकित आर्य आणि त्याच्या दोन साथीदारांचा सहभाग समोर आला. प्राथमिक तपासात असे काही तथ्य समोर आलं ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. रिसॉर्टमध्ये काम करताना रिसॉर्टमालक पुलकित आर्यने अंकिताला 'व्हीआयपी' पाहुण्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' देण्यास भाग पाडलं होतं, असं उघड झालं. अंकितानं तसं करण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

Ankita Bhandari Murder Case
लग्नासाठी मुली दाखवू, सिंधुताई सपकाळ संस्थेच्या नावाने फसवणूक; आमिष दाखवून मुलांच्या कुटुंबांकडून हजारो रुपये लुबाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com