५ लाख द्या अन्यथा...; सूनेला अंगावरील कपड्यांवर हाकललं, ६० दिवसाच्या आतच नवविवाहितेला...

Bhandara Crime : भंडाऱ्याच्या प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवी हिचा विवाह १९ जानेवारी रोजी नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआऊटमधील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे (वय २८) याच्याशी झाला होता.
woman harassed for 5 lakh dowry
woman harassed for 5 lakh dowrySaam Tv News
Published On

शुभम देशमुख, साम टिव्ही

भंडारा : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून हुंडा, घरगुती हिंसाचार, छळवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. 'मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर, ५ लाखांचा हुंडा द्या, अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू,' अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या ६० दिवसांत अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भंडाऱ्याच्या प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवी हिचा विवाह १९ जानेवारी रोजी नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआऊटमधील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे (वय २८) याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसातच पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांनी वैभवीकडे ५ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा सुरू केला. हुंड्यासाठी तिचा सतत्यानं मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. हुंडा न मिळाल्यामुळे वैभवीला २० मार्चला सासरहून अंगावरील कपड्यांसह घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूरला गेले असता, सासरच्यांनी '५ लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीला घेऊन जा', असं स्पष्ट सांगितलं. एवढ्यावरच न थांबता, 'आमचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू,' अशीही धमकी दिली गेली.

woman harassed for 5 lakh dowry
Pune Murder Mystery : त्यांना पोहता येत होतं, मग बुडाले कसे? वर्षभर बायकोच्या डोक्यात शंका; अखेर पुण्यातील हत्येचं गूढ उकललं

या सगळ्या प्रकारानंतर वैभवीचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा राजेंद्र आणि नणंद नंदिनी यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

woman harassed for 5 lakh dowry
Shocking News: तो प्रवास अखेरचा ठरला! समोरच्या कारचालकानं ब्रेक दाबला अन् अनर्थ घडला, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com