Abbas Ansari: प्रक्षोभक वक्तव्य भोवलं! अब्बास अन्सारींना डबल दणका, आमदारकी जाणार

Abbas Ansari Hate Speech case: मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी केपी सिंह यांनी आमदार अब्बास अन्सारी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावलीय.
MLA Abbas Ansari
Abbas Ansari Hate Speech caseSaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी यांचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणं भोवलं आहे. द्वेषपूर्ण भाषण करण्याप्रकरणी मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावलीय. यामुळे अन्सारीची आमदारकी धोक्यात आलीय. याचबरोबर ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.

मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी केपी सिंह यांनी या प्रकरणी निकाल दिलाय. २०२२ च्या उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता. अब्बासने अधिकाऱ्यांशी हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयावरून हे स्पष्ट झालंय की, अब्बास अन्सारी आता विधानसभेचे सदस्यत्व गमावावे लागेल. अन्सारीसह या प्रकरणातील सहआरोपी मन्सूर अन्सारीला ६ महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

MLA Abbas Ansari
PM मोदींविरोधात विधान भोवलं,पुण्यातील महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

अब्बास हे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा आमदार आहेत. मऊच्या एमपी-एमएलए कोर्टाने ही शिक्षा सुनावलीय. मऊ कोतवालीचे तत्कालीन उपनिरीक्षक गंगाराम बिंद यांनी एफआयआर दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषण आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी हा निर्णय देण्यात आलाय.

या प्रकरणातील पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, सीजेएम डॉ. केपी सिंह यांनी निर्णयासाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली होती. २०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान अब्बास अन्सारी यांनी द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी अब्बास अन्सारी आणि उमर अन्सारी यांच्याविरुद्ध कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.अब्बास आणि उमर यांना कडक सुरक्षेत एमपी आमदार न्यायालयात हजर करण्यात आलं.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. या प्रकरणातील पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, सीजेएम डॉ. केपी सिंह यांनी निर्णयासाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली होती. याअंतर्गत आज निकाल सुनावण्यात आलाय. याअंतर्गत निर्णय दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com