

भोपाळमध्ये धक्कादायक घटना
दीड वर्षे बलात्कार आणि ३ वेळा जबरदस्ती गर्भपात
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू
मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने एका महिलेवर दीड वर्षे बलात्कार केल्याची आणि तिचा ३ वेळा जबरदस्ती गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली. नोकरीच्या शोधात असलेल्या पीडित घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत त्याने हे भयंकर कृत्य केले. पीडित महिलेने थेट पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर बिल्डरच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये राहणारी घटस्फोटित महिला नोकरीच्या शोधात भोपाळमध्ये आली होती. तिला नोकरी मिळाली पण तिच्यासोबत भयंकर घडलं. शहातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने या महिलेला काम देत तिची फसवणूक केली. त्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. बिल्डरच्या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. त्याने या महिलेसोबत आधी मैत्री केली. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
तब्बल दीड वर्षे बिल्डरच्या मुलाने या महिलेवर शारीरिक अत्याचार केला. मध्य प्रदेशातील नामांकित हॉटेल्समध्ये नेऊन तो तिच्यावर बलात्कार करत होता.आरोपीने ३ वेळा तिचा जबरदस्ती गर्भपात केला. पीडित महिलेने न्यायासाठी थेट पोलिस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये अर्ज दाखल करून कारवाईची मागणी केली. एसपींनी तपासानंतर या प्रकरणी एमपी नगर पोलिस ठाण्यात बिल्डरच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. तसंच त्यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन देखील दिले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी दोघेही विवाहित आहेत. पीडितेचा घटस्फोट झाला असून घटस्फोटानंतर ती कानपूरवरून भोपाळला आली होती. ती भोपाळमधील एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्याठिकाणीच ती बिल्डरच्या मुलाच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर बिल्डरने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. पण नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.