Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; उत्तर प्रदेश कनेक्शन आलं समोर

Rohit Shetty firing Case: मुंबईतील रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणात क्राईम ब्रांचची मोठी कारवाई केली आहे. १४वा आरोपी उत्तर प्रदेशातून अटक केली असून तपासाला आणखी वेग आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Rohit Shetty House Firing Case
Rohit Shetty House Firing CaseSaam Tv
Published On

Rohit Shetty firing Case: मुंबईत काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर रात्री अचानक गोळीबार झाल्याने बॉलिवूडसह संपूर्ण मुंबईला धक्का बसला. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी लगेच कडक कारवाई करायला सुरुवात केली. या प्रकरणात १३ लोकांना अटक केली आहे. आता या गाजलेल्या रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला असून, तपासाला नवे वळण मिळाले आहे. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणातील १४वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोलू पंडित हा या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. अखेर उत्तर प्रदेशमधून त्याला ताब्यात घेण्यात यश आले. या कारवाईनंतर आरोपीला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असून, उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Rohit Shetty House Firing Case
Durandhar 2: कोण आहे दाऊद? 'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब'ची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

या प्रकरणातील आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. फायरिंगच्या घटनेमागील नेमका हेतू, त्यामागील सूत्रधार आणि संपूर्ण कट उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहे. गोलू पंडित याच्याकडूनही या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Rohit Shetty House Firing Case
Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची त्सुनामी! रणवीरने मोडले आमीर-शाहरुख-सलमानचे रेकॉर्ड, असा पराक्रम करणारा पहिलाच हिरो

मुंबईत घडलेल्या या फायरिंगच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यावर पोलिसांचा भर आहे. आरोपीला मुंबईत आणल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात येणार असून, त्यातून या गुन्ह्याशी संबंधित आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांकडून पुढील तपास अधिक वेगाने सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सर्व पैलू उघड होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com