Hingoli Crime: माझ्या पोरासोबत लग्न करायचं, मग माझ्याशी शारीरिक संबंध ठेव; बाप-लेकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Father-Son Physical Assult Minor Girl: बाप-लेकानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना हिंगोलीत घडलीय. सोशल मीडियाच्या एक चॅटिंग अॅपवर ओळख निर्माण करत त्यांनी तिला हिंगोलीत बोलवलं होतं.
Bhandara Crime
Bhandara CrimeSaam tv
Published On
Summary
  • मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • सोशल मीडियावरील एका चॅटिंग अॅप ओळख निर्माण केली होती.

  • ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला हिंगोलीत बोलवलं होतं.

  • अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दिलं होतं.

संदीप नागरे, साम प्रतिनिधी

हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंटरनेटवरील 'वीप्ले' या चॅटिंग ॲप्सवरून अल्पवयीन मुलीशी ओळख करत तिच्यावर बाप-लेकानं अत्याचार केल्याची बाब उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसांनी बाप-लेकाला अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक नागपुरे (वडील) व मंगेश नागपुरे (मुलगा) अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आहे. एका सोशल मीडिया अॅपवरून मुलीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अल्पवयीन पीडितेला हिंगोलीत बोलवलं होतं. त्यानंतर आरोपी बाप लेकानं तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान याप्रकरणी पीडितेनं हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीय.

Bhandara Crime
Mumbai Crime : धक्कादायक! ३७ वर्षीय क्रिकेट कोचकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिला हिंगोलीत बोलवलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.तरुणाने अत्याचार केल्यानंतर त्याच्या वडिलांनीदेखील मुलीला अत्याचार केला. माझ्या मुलासोबत लग्न करायचा असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगत म्हणत आरोपीच्या वडिलांनी पीडितेवर अत्याचार केला. दोन्ही बाप-लेकाकडून वारंवार मुलीवर अत्याचार केला जात होता. मुलीने अनेकवेळा तेथून सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात तिला यश मिळालं नाही.

Bhandara Crime
Schoking News : "तू खूप क्युट दिसतेस" स्कुल बस चालकाकडून ९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; संभाजीनगर हादरले

अशी उघडकीस आली घटना

पीडिता मुलीला लग्नाचे आमिष देऊन बोलवल्यानंतर आरोपी बाप-लेकानं तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यावेळी तिने त्या जाचातून सुटण्यासाठी तिने अनेकवेळा प्रयत्न केला,परंतु त्यात तिला यश आले नाही. त्यानंतर तिने पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करत पोलिसांकडून मदत मागितली. पोलिसांना आणि त्यानंतर बाप लेकाचं बिंग फुटले.

दरम्यान हिंगोली ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी दीपक नागपुरे (वडील) व मंगेश नागपुरे (मुलगा) या दोघांना अटक केलीय. हिंगोली ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींची साथ आहे का, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com