Jaipur Crime News: अमानुषतेचा कळस! नातेवाईकानेच केला धावत्या बसमध्ये १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, जयपूरमधील घटना

Minor Girl Abused: चालत्या बसमध्ये १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना जयपूरहून मध्य प्रदेशला जात असलेल्या बसमध्ये घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv

Minor Girl Abused In Moving Bus

काही दिवसांपूर्वी धावत्या रेल्वेत तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता एका अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Crime News In Marathi)

जयपूरहून मध्य प्रदेशला जात असलेल्या बसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २५ जानेवारी रोजी घडली. धावत्या बसमध्ये २१ वर्षीय नातेवाईकानेच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडित मुलीचं कुटूंब मुळ मध्य प्रदेशचं आहे. ते जयपूरच्या (Jaipur) करणी विहार भागात राहतात. आरोपीचं पीडितेच्या घरी जाणं येणं होतं. तो अनेकदा त्यांच्या जयपूरच्या घरी जात असत. त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने बसमध्ये बसायला लावलं होतं, अशी माहिती मिळतेय.

गुन्ह्याच्या दिवशी देखील आरोपी पीडितेच्या घरी गेला होता. तेव्हा पीडितेला तिच्या भावाने तिला बाहेर बोलावलं, असं पीडितेच्या कुटुंबियांनी (crime news) सांगितलं. त्यानंतर आरोपीने कथितपणे काहीतरी बहाणा करून पीडित मुलीला घेऊन ऑटोमध्ये बसून तिला बसस्थानकावर आणले.

Crime News
Sangli Crime News: वर्गमित्रांमध्ये किरकोळ वाद, एकाने दप्तरातून कोयता काढला अन् थेट... भयंकर घटनेने सांगलीत खळबळ

त्यानंतर आरोपीने तिला स्लीपर बसमध्ये बसवून त्याच्यासोबत मध्यप्रदेशातील त्यांच्या मूळ गावी जाण्यास सांगितलं. मला विरोध केल्यास, तुला जीवे मारीन अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली. भीतीपोटी पीडिता गप्प राहीली. बसमध्ये त्याच्यासोबत गेली. आरोपीने तिच्यावर चालत्या वाहनात बलात्कार (Minor Girl Abused In Moving Bus) केला.

त्यानंतर आरोपीने तिला त्याच्या मूळ गावी नेलं आणि एका खोलीत बंद केलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती गावातील इतर नातेवाईकांच्या मदतीने पळून जाऊन जयपूरला पोहोचण्यात यशस्वी झाली. घरी आल्यावर तिने घडलेला सगळा प्रकार (Minor Girl Abused) तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी करणी विहार पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

Crime News
Beed Crime News: अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग ; रोडरोमियोने बळजबरीनं कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com