Sangli Crime News: वर्गमित्रांमध्ये किरकोळ वाद, एकाने दप्तरातून कोयता काढला अन् थेट... भयंकर घटनेने सांगलीत खळबळ

Sangli Latest News: सांगलीत एका हायस्कुलमधील विद्यार्थ्याने वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sangli Crime News
Sangli Crime News Saam TV

Sangli Crime News:

सांगलीत एका हायस्कुलमधील विद्यार्थ्याने वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला आहे. शहरातील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या प्रकाराने शाळेत मुलांचे चाललेय तरी काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान जावेद मुल्ला आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी (२९ जानेवारी) दप्तरातून कोयता आणला होता.

सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli Crime News
Maratha Reservation: 'मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ही बनवाबनवी...' मराठा सेवा संघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांचे मोठे विधान

जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तेथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर बनली आहे. सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे. (Latest Marathi News)

Sangli Crime News
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला लांबणीवर! वेळ वाढवून दिल्यानं शिवसेनेसारखाच निकाल येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com