Maratha Reservation: 'मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ही बनवाबनवी...' मराठा सेवा संघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांचे मोठे विधान

Purushottam Khedekar On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण दिलं हे दिशाभूल असून बनवाबनवी आहे. आरक्षण काही मिळालेलं नाही, असे मोठे वक्तव्य मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
Purushottam Khedekar On Maratha Reservation
Purushottam Khedekar On Maratha ReservationSaamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा|ता. ३० जानेवारी २०२४

Wardha News:

मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना दिलेले परिपत्रक म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा तो काहीही अधिकृत पुरावा नाही. यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं हे दिशाभूल असून बनवाबनवी आहे. आरक्षण काही मिळालेलं नाहीय, असे मोठे वक्तव्य मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेवा संघाच्या वतीने सुरु असलेल्या जनसंवाद दौर्‍या निमित्त पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) हे वर्धेत आले होते. यावेळी खेडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर यांनी सरकारकडून मराठा आरक्षण दिल्याच्या घोषणेवरुन जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाची घोषणा ही दिशाभूल करणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले पुरुषोत्तम खेडेकर?

"सरकारने काढलेल्या या परिपत्रकाच्या माध्यमातून सगेयसोयऱ्यांना आरक्षण दिले जाईल किंवा समावेश होईल असं सांगत त्यावर 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप बोलविण्यात आले आहेत. यावर अनेक आक्षेपही येतील. सगेसोयरे व वंशावळ हे वेगवेगळे शब्द आहेत. भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत व सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या चौकटीनुसार आरक्षणाचे लाभधारक हे केवळ पितृसत्ताक पद्धतीने येणारे वंशावळ आहे," असे पुरुषोत्तम खेडेकर म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Purushottam Khedekar On Maratha Reservation
Solapur Crime News: सोलापूर हादरलं! कोल्ड ड्रिंकमधून विष पाजून बापानेच घेतला मुलाचा जीव; मन सुन्न करणारं कारण समोर

तसेच सरकारच्या अध्यादेशानुसार आरक्षण (Maratha Reservation) हे केवळ रक्ताच्या नात्यांना लागू आहे. या परिपत्रकात लिहलेल सगेसोयारे हा शब्द विस्तारित न होता केवळ वंशावळ पुरता मर्यादित राहील. कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारला बदल करावा लागेल. यामुळे सगेसोयरे यांना सरसकट कुठलाही आरक्षण लागू होणार नाहीय. असंही खेडकर म्हणाले. (Latest Marathi News)

Purushottam Khedekar On Maratha Reservation
Rajya Sabha Election 2024: मोठी बातमी! महाराष्ट्रातील राज्यसभेवरील रिक्त 6 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com