(रामू ढाकणे)
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभे राहिलं होतं ते आंदोलन अचानक थांबले आहे, ते चुकीच्या पद्धतीने थांबले आहे. कारण देण्यात आलेली अधिसूचना सरकारने काढली आहे, त्या अधिसूचनेत काहीही नव्याने मिळालेले नाही, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला फसवलं आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय. (Latest News)
अधिसूचनेमध्ये जे सगळे सगे-सोयऱ्याचा उल्लेख आहे, तो पितृ सत्तेच्या आधारे दिलेला आहे. त्यातच कुणबी आणि मराठा हे जरी एक असले तरी कायद्याने ते ग्राह्य धरले जात नाही. त्याची व्हॅलेडीटी होणार नाही, त्यामुळे जुनं जे होतं त्यामध्ये नव्याने काहीही झालेलं नाही, यामुळे या आंदोलन चुकीच्या पद्धतीने थांबले आहे. हे आंदोलन थांबण्याला काही हरकत नाही, मात्र सरकारकडून काहीतरी लेखी व ठोस घेणं गरजेचं होतं आचारसंहितेपूर्वी तुम्ही जर काही देणार नसाल तर आम्ही निवडणुकीत धडा शिकवू, असा इशाराही देऊ शकलो असतो. कारण खूप मोठा जनाधार या आंदोलनाच्या पाठीमागे उभा होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२६ जानेवारीला प्रत्येक गावागावातील व्यक्ती मुंबईच्या दिशेने निघाला होता. या आंदोलनातून काहीतरी हाती लागेल ,अशी अपेक्षा लागून होती. मात्र खूप मोठा अपेक्षाभंग मराठा समाजाचा झाला आहे. मराठा समाजाला मी आव्हान करतो की, भावनेच्या भरात तुम्ही काही जल्लोष करू नका. आपल्याला काहीही मिळालेले नाही मात्र हा लढा आपण पुन्हा सुरू ठेवू. जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी समावेश होत नाही, तोपर्यंत आपण मराठा संघटनांच्या वतीने चालू ठेवू असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक शिवानंद भानुसे यांनी केलाय.
सगे सोयरे परंतु पितृ सत्ताक, असं त्या अधिसूचनेत म्हटलंय. त्यामुळे पितृ सत्ता नसल्यामुळे मात्र सत्तेकडे ते वळणार नाही. त्यामुळे पहिलं जसं होतं तसंच आता राहणार आहे जे जुने होते तेच नियम आता नव्याने लागू झाले आहेत. उद्या कोणी कोर्टात गेला तर काहीही फरक पडणार नाही, कारण या आधिसूचनेत ऑब्जेक्शन घेण्यासारखे काहीही नाही.
मनोज जरांगे पाटील जर म्हणत असतील सगे सोयरे म्हणजे सरसकट तर त्यांच्या कोणी कायदे तज्ञ असतील किंवा सल्लागार असतील. तर त्यांनी लाईव्ह येऊन सांगावं की नेमकं या अध्यादेशातून काय मिळणार आहे. नव्याने काय झालेला आहे, मात्र असं काहीही झालं नाही, असं आमचं स्पष्ट मत असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी सांगितला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.