Solapur Crime News: सोलापूर हादरलं! कोल्ड ड्रिंकमधून विष पाजून बापानेच घेतला मुलाचा जीव; मन सुन्न करणारं कारण समोर

Solapur News: शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Solapur Crime
Solapur CrimeSaamtv
Published On

Solapur Crime:

शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. विजय बट्ट असे क्रूर पित्याचे नाव असून कीर्ती बट्ट असे मृत मुलाचे नाव आहे. १५ दिवसांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने सोलापूर शहर हादरुन गेले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ही खळबळजनक घटना सोलापुरातील (Solapur) जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरातील आहे. या भागात राहणारे विजय बट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रातीच्या दिवशीच कोल्ड्रिंगमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

विजय बट्ट यांनी संक्रातीच्या दिवशी मुलगा कीर्ती बट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी नेले व कोल्ड्रिंगमध्ये सोडीयम नायट्रेंटची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले. १५ दिवसांपुर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. अखेर १५ दिवसांनी आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solapur Crime
Girish Mahajan: खातेवाटपात होणाऱ्या बदलामुळे भाजपचे ‘संकटमोचक’ नाराज; फडणवीसांसमोर व्यक्त केली खंत

स्वतः मुलाच्या वडिलांनेच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Solapur Crime
Rajya Sabha Election 2024: मोठी बातमी! महाराष्ट्रातील राज्यसभेवरील रिक्त 6 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com