Sharad Mohol Death Case: शरद मोहोळ खून प्रकरण: मुख्य सुत्रधार गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Sharad Mohol Death: शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गणेश मारणेला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Sharad Mohol Murder Case
Sharad Mohol Murder CaseSaam TV

अक्षय बडवे, पुणे|ता. ३० जानेवारी २०२४

Sharad Mohol Death Update:

कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गणेश मारणेला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य सुत्रधार गणेश मारणे हा अद्याप फरार आहे. गणेश मारणेने अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे हा मुख्य आरोपी आहे. त्याला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचे नाव घेतले आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Mohol Murder Case
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला लांबणीवर! वेळ वाढवून दिल्यानं शिवसेनेसारखाच निकाल येणार?

दरम्यान, शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात आत्तापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. (Latest Marathi News)

Sharad Mohol Murder Case
Sambhaji Brigade On Maratha Aarakshan: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला फसवलं; संभाजी ब्रिगेडचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com