NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला लांबणीवर! वेळ वाढवून दिल्यानं शिवसेनेसारखाच निकाल येणार?

NCP Crisis: राष्ट्रवादी फुटीवर आता १५ तारखेपर्यंतची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.
NCP Disqualification Case
NCP Disqualification CaseSaam TV
Published On

>> सुनिल काळे

NCP MLA Disqualification:

राष्ट्रवादी फुटीवर आता १५ तारखेपर्यंतची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा निर्णय लांबणीवर पडणार आहे. पर्यायानं सेनेसारखाच वेळ राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, वर्तवली जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP Disqualification Case
Aaditya Thackeray: 'भाजप स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकत नाही', आदित्य ठाकरे कडाडले

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. आधी ३१ मार्चपर्यंतचा निर्णय आता नार्वेकरांना १५ फेब्रुवारीपर्यंत घ्यावा लागणार आहे. त्यामुळं शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो, असं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय द्यायचा होता. त्यावेळीही अध्यक्षांना कोर्टानं मुदतवाढ दिली होती. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतला. त्यावर कोर्टानं १५ तारखेपर्यंत वेळ दिली. ३१ तारखेपर्यंत सुनावणी घेऊन १५ तारखेपर्यंत‌ निकाल देणार असल्याचं अध्यक्षांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

NCP Disqualification Case
Kalyan News: महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, कमरेला दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; असं उघडकीस आलं प्रकरण

सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना १५ दिवसांचा वेळ वाढवून दिल्यानं आता शिवसेनेप्रमाणंच राष्ट्रवादीचा निकाल येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल अजून येणं अपेक्षित आहे. त्यामुळं जर या पंधरा दिवसात निवडणूक आयोगानं निकाल दिला. तर त्याच निकालाच्या आधारे नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रा प्रकरणावर आपला निकाल देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com