Aaditya Thackeray: 'भाजप स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकत नाही', आदित्य ठाकरे कडाडले

Aaditya Thackeray On BJP: ''भाजप निवडणूक ही स्वतःच्या बळावर जिंकू शकत नाही, हे सिद्ध झालंय. आता जे काय आकडे ते सांगतात. आम्ही एवढे पार करू तेवढे पार करू'', असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Aaditya Thackeray On BJP
Aaditya Thackeray On BJPsaam tv
Published On

>> सचिन गाड

Aaditya Thackeray On BJP:

''भाजप निवडणूक ही स्वतःच्या बळावर जिंकू शकत नाही, हे सिद्ध झालंय. आता जे काय आकडे ते सांगतात. आम्ही एवढे पार करू तेवढे पार करू'', असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून एनडीएसोबत जात 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर बोलताना ते म्हणाले, ज्यांनी भाजपवर विचित्र आरोप केले. त्यांना सोबत घेतलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aaditya Thackeray On BJP
Kalyan News: महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, कमरेला दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; असं उघडकीस आलं प्रकरण

राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात दोन पक्ष आणि एक परिवार फोडण्याची त्यांना गरज नव्हती. हे जरी झालं तरी, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आज प्रत्येकाच्या मनात बसलेली आहे आणि आमच्या सोबत जनता राहील. (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे म्हणाले, ''भाजप स्वतःच्या कामाच्या बळावर जिंकू शकत नाही. म्हणून रवींद्र वायकर, राजन साळवी, सुरज चव्हाण, किशोरी पेडणेकर या सगळ्यांना हैराण केले जात आहे. रोहित पवारांना देखील यासाठीच बोलवलं होतं. जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात, त्यांना हैराण केले जातं.

Aaditya Thackeray On BJP
Delhi Solar Policy: दिल्लीत सर्वांना मिळणार मोफत 'वीज', केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी आणलं नवीन धोरण

आदित्य ठाकरे म्हणाले आहे की, ''आपल्या राज्यामध्ये खास करून मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमाचे प्रकरण सुरू आहेत. माझं एकतर्फी प्रेम हे आपले म्युनिसिपल कमिशनर आणि प्रशासक चेहेल साहेबांवर आहे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रेम हे कंत्राटदार आहे आणि बिल्डरांवर आहे. रेसकोर्स आणि रस्त्यांचा विषय असेल इथे बिल्डर आणि कंत्राटदार हे एवढंच त्यांचं चालतं. एवढेच त्याच्यासाठी काम करत असतात.''

ते म्हणाले, ''जानेवारी 2023 मध्ये मी पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा बाहेर काढायला होता. मी प्रत्येक महिन्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस सांगितले की, हा घोटाळा आहे. साधारण तीनशे कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याच्या बातम्या आहेत. आपले जनतेचे पैसे हे बिल म्हणून त्यांना बीएमसी देते. आज सुद्धा हा घोटाळाच आहे. अजून सहा हजार कोटींची काम याच कंत्राटदार कंत्राटदारांना देण्यात आली आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com