Crime: धक्कादायक! कुऱ्हाडीनं वार करत घेतला बायको अन् 8 वर्षाच्या चिमुकलीचा जीव

Dharashiv Crime : धारशिव जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
Dharashiv  Crime :
Police investigation underway after a shocking double murder in Beradwadi village of Dharashiv district.saam tv
Published On
Summary
  • धाराशिवच्या उमरगा तालुक्यात दुहेरी खूनाची धक्कादायक घटना

  • पतीने पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलीची हत्या केली

  • घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसांकडे शरण

राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात आठवडाभरात ५ खूनाच्या घटना घडल्या. सांगलीत २४ तासात २ हत्येच्या घटना घडल्या. आता धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर हा व्यक्ती पोलिसांना शरण आला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Dharashiv  Crime :
Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

अजित अपन्ना वासुदेव असे आरोपी वडिलांचे नाव आहे. अजितने पत्नी लिंबाबाई वासुदेव आणि त्यांची ८ वर्षीय मुलगी मानसीची निर्घृण हत्या केली. अजितने पत्नी आणि मुलीची हत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र आरोपी स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय.

Dharashiv  Crime :
Crime news: बाबानं माझ्यावर बलात्कार केला...! मुलगी रस्त्यावर भीतीनं पळत सुटली, साधूवरील गंभीर आरोपांनी खळबळ

हाती आलेल्या माहितीनुसार अजित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्याने पत्नीचा खून केला. खून करताना चिमुकल्या मुलीने पाहिले. त्यामुळे त्याने कसला ही मागचा पुढचा विचार न करता चिमुकल्या लेकीला ही संपवलं. यावेळी मुलगा ही घरी होता. त्याला ही संपवण्याचा बापाचा प्लॅन होता. पण तो तिथून पळाला आणि थोडक्यात बचावला. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडालीय.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अजित अपन्ना वासुदेव हा मंगळवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात आला. आपण कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी लिंबूबाई व मुलगी मानसी या दोघींचा खून केला असं पोलिसांना सांगितले. यावरून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीपान दहिफळे हे फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शिवाय शवविच्छेदनासाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com