

मथुराच्या वृंदावनमधून एक अशी घटना समोर आली आहे, जी पाहून सर्वांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे उत्तर प्रदेशातील मथुरा-वृंदावन परिसरात खळबळ उडालीये. एका अल्पवयीन मुलीने रस्त्यावर रडत रडत साधूच्या वेशात असलेल्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे.
ही घटना वृंदावनमधील परिक्रमा मार्गाजवळ घडल्याचं सांगितलं जातंय. सोमवारी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागला. व्हिडिओमध्ये मुलगी अत्यंत घाबरलेली पाहायला मिळतेय. यावेळी ती जोरजोरात रडत असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका साधूवर थेट आरोप करताना दिसते. न्याय मिळावा म्हणून ती झोपून रस्ता अडवण्याचाही प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायाला मिळतंय.
पीडित मुलीच्या आरोपानुसार, त्या साधूने तिला पिण्यासाठी ज्यूस दिला होता. त्या जूसमध्ये काहीतरी नशेचं औषध मिसळल्याचं तिने म्हटलंय. दरम्यान तो ज्यूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्याच अवस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे. तिने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसमोर त्या साधूची ओळखही सांगितली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. यासोबतच सोशल मीडियावर आरोपीचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच मथुरा पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार जैंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. दरम्यान हा व्हिडीओ किती खरा आहे किंवा बनावटीचा आहे याची तपासणी सध्या सुरु आहे. मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रोसेस सुरू असून आरोपीची ओळख पटवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
हा व्हिडीओ सोसश मीडियावर पोस्ट होताच तो वेगाने व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडियावरही लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र यावेळी सरकारने शांतता ठेऊन अफवांवर विश्वास ठेऊ नये असं सांगितलं आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत. जर हा व्हिडीओ खरा असेल तर त्यासंबंधित आरोपीवर कारवाई होईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.
(डिस्क्लेमर- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.