

बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बेउर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात एका सासूने आपल्या सुनेवर गंभीर आरोप केलेत. यावेळी सासूने सूनेवर घरात आलेल्या पाहुण्यासोबत अश्लील कृत्य करताना पकडलं होतं. सासूच्या तक्रारीनुसार, तिच्या मुलाने 10 वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. 2016 साली दोघांनी मंदिरात लग्न केलं. सुरुवातीला त्यांचं संसार सुरळीत चालला होता.
परंतु लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. सासूचा आरोप आहे की, त्या काळात सुनेला घरात आलेल्या एका पाहुण्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडण्यात आलं होतं. त्या घटनेनंतर कुटुंबात मोठा वाद झाला. मात्र, सुनेने माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही असे आश्वासन दिल्याने मुलाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि कुटुंबापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
यानंतर काही वर्षांनी 2024 मध्ये कुटुंबीयांनी समजूत काढून या जोडप्याला पुन्हा एकत्र राहण्यासाठी घरी बोलावलं. त्या काळात सुनेने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली होती आणि काही काळ सर्व काही सुरळीत असल्याचं वाटत होतं. मात्र, सासूच्या म्हणण्यानुसार, हळूहळू सुनेच्या वागण्यात पुन्हा बदल दिसू लागला. ती वारंवार छतावर किंवा बाथरूममध्ये जाऊन मोबाईलवर दीर्घकाळ बोलत बसायची. त्यामुळे कुटुंबीयांना तिच्यावर पुन्हा संशय येऊ लागला.
एक दिवस दाट संशय आल्याने मुलाने एक दिवस पत्नीचा मोबाईल तपासला. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये ज्या गोष्टी समोर पाहिल्या त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. सासूचा आरोप आहे की, सुनेचं एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध असल्याचं उघड झालं. मोबाईलमधील चॅटमध्ये आक्षेपार्ह आणि पर्सनल चॅट सापडल्याने मुलगा मानसिकरित्याही खचला. या चॅटचे स्क्रीनशॉट सासूने पुराव्यासाठी महिला आयोगाकडे सादर केलेत.
याचदरम्यान मुलाने शांततेने या विषयावर पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सुनेने उलट त्यालाच धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. सासूच्या म्हणण्यानुसार, सुनेने हुंड्याच्या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. “महिलांसाठी कायदे किती कडक आहेत, याची तुला कल्पना नाही. मी सगळ्यांना अडचणीत आणू शकते,” असं ती म्हणाल्याचा दावा सासूने केलाय.
सततच्या वादामुळे मुलाची मानसिक स्थिती खालावली असून तो सध्या डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचं समोर आलंय. तरीही आपल्या सहा वर्षांच्या मुलीच्या भविष्यासाठी तो हा संसार टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सासूने म्हटलंय. कुटुंब पुन्हा सुरळीत व्हावे, यासाठी सासूने महिला आयोगाकडे मदतीची विनंती केली आहे.
बिहार राज्य महिला आयोगाच्या सदस्या शीला टुड्डू यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, सासूने दिलेल्या तक्रारीसोबत काही चॅटचे स्क्रीनशॉटही मिळाल्याची माहिती दिलीये. सुनेला समन्स बजावण्यात आला असून तिला आपला पक्ष मांडण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.