Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime NewsSaam Tv News

Ratnagiri Crime : शिकारसाठी बंदूक चालवली, गोळी भलतीकडेच लागली; दिवसाढवळ्या रत्नागिरीत थरारक घटना

Ratnagiri Crime News : चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात हाय लाइफ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अश्रफ तांबे यांच्या किचनमध्ये एक गोळी काच फोडून आतमध्ये आली आणि मोठा आवाज झाल्यानं हे कुटुंब घाबरलं.
Published on

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऐन पावसाळ्यात भात लावणीच्या दिवसांत चक्क दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदुकीतून गोळी सुटून गोळकोट परिसरात चक्क एका इमारतीच्या किचनमध्ये काच फुटून आतमध्ये आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार समजताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. ही घटना सकाळी ११ ते १२च्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात हाय लाइफ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अश्रफ तांबे यांच्या किचनमध्ये एक गोळी काच फोडून आतमध्ये आली आणि मोठा आवाज झाल्यानं हे कुटुंब घाबरलं. पलीकडच्या शेतातून शिकारीच्या हेतूने ही गोळी झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Ratnagiri Crime News
Yuvraj Mathankar : नागपुरच्या कुख्यात गुंडाचा शिवसेनेत प्रवेश? शिंदे गटाकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला छिद्र पडलेलं दिसलं. या छिद्रातून गोळी खाली पडलेली दिसली. चक्क दिवसाढवळ्या डुकराची शिकार करत असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारची गंभीर दाखल चिपळूणचे पोलीस अधीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी घेतली असून या सगळ्या प्रकारची माहिती आजूबाजूच्या लोकांकडून घेण्याचं काम सुरू आहे. या बिल्डिंगच्या जवळच शेतात भातलावणीचं काम सुरू आहे. तेथील काही महिलांनी काही लोक डुकराचा पाठलाग करत असताना पहिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

त्यामुळे आता चिपळूण पोलिसांचे पथक या परिसराजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज आदी तांत्रिक बाबींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. तरी आपण या प्रकरणी चौकशी सुरू केली असून हा प्रकार नक्की कोणी केला त्याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलेचंद्र मेंगडे यांनी दिली आहे.

Ratnagiri Crime News
Pune Politics: शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला पुण्यात धक्का, बड्या नेत्यासह हजारो शिवसैनिकांनी मशालची साथ सोडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com