Pune Politics: शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला पुण्यात धक्का, बड्या नेत्यासह हजारो शिवसैनिकांनी मशालची साथ सोडली

Pune Political Shifts: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का. तालुका प्रमुख दत्ता गांजाळे व शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
maharashtra politics
eknath shinde vs uddhav thackeray Saam tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असतानाच, नेत्यांकडून मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत जनता नक्की कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात मतदानाचा भर टाकते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शिंदे गटाने एक मोठा राजकीय झटका दिला आहे. ठाकरे गटाचे आंबेगाव तालुक्याचे विद्यमान तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी अनेक शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटाला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. आंबेगाव तालुक्याचे विद्यमान तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी अनेक शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गांजाळे यांनी स्पष्ट नेतृत्व आणि मजबूत संघटनात्मक पाठबळ असल्याचं सांगितलं.

maharashtra politics
Black Magic: काळी जादूसाठी महिलेकडून अघोरी कृत्य! कुत्र्यांचं मुंडकं छाटत पूजा; पोस्टमार्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती समोर

यावेळी त्यांनी ठाकरे गटातील स्थानिक गटबाजीवर नाराजी व्यक्त केली. मंचर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनीही या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा राजीनामा दिला असून, तालुक्यातील इतर भागांतील शिवसैनिकही लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला येत्या काळातही धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

maharashtra politics
NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळख

या राजकीय घडामोडीमुळे आंबेगाव तालुक्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा तडा बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिंदे गट अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com