NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळख

Yugendra Pawars engagement: राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडल्याची चर्चा सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमुळे उफाळून आली आहे.
Yugendra pawar engagement
Yugendra pawar engagementSaam TV
Published On

पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडेचे सूर घुमणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला आहे. तनिष्का नावाच्या तरुणीसोबत त्यांचा साखरपुडा पार पडला असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र आणि तनिष्कासोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या लग्नानंतर पवार कुटुंबात लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा नुकताच साखरपुडा झाला. तनिष्कासोबत त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी युगेंद्र आणि तनिष्का यांचे फोटो शेअर करून कॅपशनमध्ये शुभेच्छा दिल्या.

Yugendra pawar engagement
Pune Crime: अ‍ॅपवरून भक्तांच्या खासगी आयुष्यात नजर, जादूटोणा अन् वेश्यागमन; पुण्यातील भोंदूबाबाचा पर्दाफाश

सुप्रिया सुळेंनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये युगेंद्र पवारांना शुभेच्छा दिल्या, 'आमच्या कुटुंबातील आनंदाची बातमी शेअर करत आहे. माझा पुतण्या युगेंद्र पवार याचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. त्यांनी आयुष्यभर खुश आणि आनंदीत, एकत्र राहावं हीच इच्छा...तनिष्का तुझं पवार कुटुंबात स्वागत..'

Yugendra pawar engagement
MHADA Home: म्हाडाची ६२४८ घरं झाली स्वस्त, ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा, वाचा A टू Z माहिती

युगेंद्र पवार नक्की कोण?

युगेंद्र पवार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू. त्यांनी बारामती मतदारसंघातून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली. मात्र, त्यांना हवं तसं यश प्राप्त झालं नाही. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची धुराही युगेंद्र पवार यांच्याकडेच आहे. यासह युगेंद्र पवार विविध पदांवर कार्यरत आहेत.

भाग्यश्री कांबळे, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com