MHADA Housing Lottery
MhadaSaam tv

MHADA Home: म्हाडाची ६२४८ घरं झाली स्वस्त, ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा, वाचा A टू Z माहिती

Thane MHADA Homes Get Cheaper: म्हाडाच्या ठाण्यातील शिरढोण आणि खोणी गृहप्रकल्पातील ६,२४८ घरांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आता ठाण्यात २० लाखांच्या आत घर घेण्याची संधी मिळणार आहे.
Published on

म्हाडाचे ठाण्यात घर घेण्याचा विचार करत असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय म्हाडाच्या कोकण बोर्डाने घेतला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या शिरढोण आणि खोणी इथल्या गृहप्रकल्पातल्या ६,२४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आणि ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यामध्ये आता २० लाख रूपयांच्या आत घर मिळणार आहे.

किंमती कपात करण्याचा निर्णय का घेतला?

सध्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे म्हाडा विविध भागांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिरढोण आणि खोणी येथे म्हाडाच्या कोकण मंडळाचे दोन मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. या गृहप्रकल्पात एकूण ६,२४८ घरे आहेत.

MHADA Housing Lottery
Shefali Jariwala: दोन लग्न, 'कांटा लगा' गाण्यासाठी 'इतकं' मानधन, अक्षय सलमानसोबत काम, अन्.. शेफालीबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

यासंदर्भात माहिती देताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले, 'कोकण मंडळाच्या मौजे शिरढोण आणि मौजे खोणी येथे ६,२४८ सदनिका उभारण्यात येत आहे. या सदनिकांच्या सुधारीत विक्री किंमत प्रस्तावास मान्यता देऊन हक्काचे घर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले आहे'.

MHADA Housing Lottery
Shefali Jariwala: मृत्यूच्या काही मिनिटापूर्वी शेफाली जरीवाला काय करत होती? फॉरेन्सिक टीम अभिनेत्रीच्या घरी का गेली?

शिरढोणमध्ये या फ्लॅट्सच्या किमतीत १,४३,४०४ रूपये आणि खोणीमध्ये १,०१,७०० रूपये कपात करण्यात आली आहे. या फ्लॅट्सच्या नवीन किमती आता १९,२८,७४२ रूपये आणि १९,११,७०० झाल्या आहेत. म्हाडा या परिसरात हॉल, जिम आणि सुपरमार्केट यांसारख्या सुविधा देखील विकसित करण्यात येणार आहे. जवळपास शाळा आणि रूग्णालय देखील बांधण्यात येणार आहे. म्हाडा कोकण लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जुलै महिन्यात ४ हजार घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू आहे. यापैकी कल्याणमध्ये अडीच हजार घरे खासगी विकासकाकडून म्हाडाला मिळणार आहेत. तर, उर्वरित घरे ठाण्यात असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com