Shefali Jariwala: मृत्यूच्या काही मिनिटापूर्वी शेफाली जरीवाला काय करत होती? फॉरेन्सिक टीम अभिनेत्रीच्या घरी का गेली?

Shefali Jariwala: बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. फॉरेन्सिक टीम तिच्या घरी चौकशीसाठी दाखल झाली असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही.
Shefali Jariwala Death Reason
Shefali Jariwala Death ReasonSaam tv
Published On

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. वृत्तानुसार, मृत्यूच्या काही मिनीटापूर्वी ती आपल्या श्वानाला घेऊन बाहेर गेली. नंतर बेशुद्ध होऊन पडली. शेफालीला अस्वस्थ वाटल्यावनंतर पती पराग त्यागीने तिला तातडीने मुंबईतील बेलेव्यू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काही वृत्तांमध्ये अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं आहे. परंतु, अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर जरीवाला यांच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली. त्यांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी

बॉलिवूड फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर २ व्हिडिओ शेअर केल्या. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या घराबाहेर फॉरेन्सिक टीम आणि काही पोलीस दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतरच्या चौकशीसाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम जरीवाला यांच्या घरी गेल्याची माहिती आहे.

Shefali Jariwala Death Reason
Nashik: दारूच्या नशेत शिवीगाळ अन् मारहाण, आई-वडिलांनी ओढणीने आवळला मुलाचा गळा; परिसरात खळबळ

दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच फॉरेन्सिक टीम जरीवाला यांच्या घरी चौकशीसाठी गेल्यामुळे संशय व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने, 'फॉरेन्सिक टीम जरीवाला यांच्या घरी नेमकं कशासाठी? कारण काय?', असा सवाल उपस्थित केला. तर दुसऱ्याने, 'मला विश्वास बसत नाही. शेफाली आता आपल्यासोबत नाही'. सध्या हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.

Shefali Jariwala Death Reason
Gold Price: सोनं आजही स्वस्त झालं, १० तोळं सोन्याच्या किंमतीत ५५०० रूपयांनी घसरण; वाचा आजचा दर

शेफालीने अवघ्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पुढील तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा पोलीस करीत आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com