Black Magic: काळी जादूसाठी महिलेकडून अघोरी कृत्य! कुत्र्यांचं मुंडकं छाटत पूजा; पोस्टमार्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती समोर

Woman Sacrifices Pet Dog in Alleged Ritual: बंगळुरूमधील फ्लॅटमध्ये एका महिलेने अंधश्रद्धेच्या नादाने पाळीव कुत्र्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पोलीस तपास सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Bengluru Crime News
WOMAN KILLS PET DOG IN BENGALURU RITUAL, BLACK MAGIC SUSPECTEDSaam TV News
Published On

कर्नाटकची राजधानी बंगळूरूमधून एक ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं तांत्रिक विधी करत पाळिव लॅब्राडोर कुत्र्याचा गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह कापडात गुंडाळून फ्लॅटमध्ये लपवून ठेवला. शेजाऱ्यांना दुर्गंधी सहन न झाल्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तपास केला. तपासात कुत्र्याचा अंधश्रद्धेसाठी बळी घेतला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बंगळूरूच्या महादेवपूरा भागात राहणारी महिला मूळची पश्चिम बंगालची असल्याची माहिती आहे. त्रिपर्णा पाईक असे महिला आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपासून शेजारी राहणाऱ्या लोकांना उग्र वास येत होता. त्यांनी तातडीने यासंदर्भातील तक्रार महानगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांना केली. यानंतर बीएमसी पथक तपासणीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

Bengluru Crime News
Viral Couple: लिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची रासलीला! आधी मुलीने मुलाला स्वत:कडे खेचलं, अन् किस करत.. 'तो प्रसंग' तुफान व्हायरल

यावेळी बीएमसी पथकाला महिला आरोपीने रोखले. आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर बीएमसी पथकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आणि बीएमसी पथकाने थेट त्रिपर्णाच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना एका कुत्र्याचे कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला. तसेच आणखी दोन कुत्र्यांचे मृतदेह अतिशय दयनीय अवस्थेत आढळले.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेकडे आधी ४ लॅब्राडोर कुत्रे होते. त्यापैकी एकाचा मृत्यू ४ महिन्यांपूर्वीच झाला होता. फ्लॅटमध्ये कुत्र्यांच्या मृतदेहासह पुजा साहित्य आणि काही देवी देवतांचेही फोटो सापडले. पोलिसांना असा संशय आहे की, ही घटना तांत्रिक विधी किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असू शकते. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून कुत्र्यांचे मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. शवविच्छेदन अहवालातून कुत्र्यांचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bengluru Crime News
NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळख

या धक्कादायक प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com