Crime News: जिलेटिनचा स्फोट करून पान टपरी उडवली, बीडमधील खळबळजनक घटना

Gelatin Explosion To blow Shop: बीडमध्ये जिलेटिनचा स्फोट करून पान टपरी उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागिरकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Beed Crime
Beed CrimeYandex

विनोद जिरे साम टीव्ही, बीड

Beed Crime News

बीडमध्ये (Beed) जिलेटिनचा स्फोट करून पान टपरी उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागिरकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. विहीर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनचा स्फोट (Gelatin Explosion) करून पान टपरी उडवून दिली आहे. (Latest Marathi News)

सुदैवाने यात टपरी चालक अशोक भालेराव किरकोळ जखमी झाला (Beed Crime) आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहनी केली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणात एकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच या घटनेमागचे कारण समोर येणार (crime news) असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजून या घटनेचं नेमकं कारण पोलिसांना समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी कसुन तपास करत आहे. या प्रकरणामध्ये एका संशयिताला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात (Beed Crime News) आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये काहीसं भितीचं वातावरण पसरलेलं आहे. जिलेटीनचा स्फोट झाल्यामुळे टपरीचे मोठे नुकसान देखील झालं आहे.

Beed Crime
Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

केमिकल कारखान्यात फॅक्टरीत स्फोट

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी एका केमिकल कारखान्यात फॅक्टरीत स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं (Gelatin Explosion To blow Shop) की, अजून आठ ते दहा लोक अडकले होते. याचा अर्थ मृतांची संख्या वाढू शकते.स्फोटाच्या (blast) वेळी इमारतीमध्ये 50 लोक होते, असं स्थानिकांनी सांगितलं होतं. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं होतं की, फार्मास्युटिकल कंपनीच्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला (crime) होता. या स्फोटाच्या प्रभावामुळे आजूबाजूचे लोक दूर फेकले गेले होते.

Beed Crime
Crime News: पुणे हादरलं! कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून केला खून; मृतदेह जाळुन पुरला शेतात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com