Crime News: पुणे हादरलं! कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून केला खून; मृतदेह जाळुन पुरला शेतात

Friends Kidnapped And Killed Young Woman: पुण्यामध्ये कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Pune Crime
Pune Crime Saam Tv

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Pune Crime News

पुण्यातील कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण (Pune Crime) करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. नऊ लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच मैत्रिणीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी तरुणीचा खून करून तिचा मृतदेह एका शेतात जाळला आणि पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Latest Crime News)

भाग्यश्री सुडे (वय २२), असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेत अगोदर आरोपींनी तरूणीचं अपहरण केलं त्यानंतर तिचा खून केल्याचं (Friends Kidnapped And Killed Young Woman) समोर आलं आहे. इतकंच नव्हे, तर आरोपींनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मुळची लातूर ची होती आणि पुण्यातील वाघोली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ३० मार्च रोजी भाग्यश्री कॉलेजवरून परतली आणि संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये (Crime News) गेली. या ठिकाणी तिची भेट शिवम, सागर आणि सुरेश यांच्याशी झाली. ते तिचे आधीपासून मित्र होते. या तिघांबरोबर भाग्यश्री बाहेर गेली आणि त्या दिवसापासून तिचा फोन बंद होता.

भाग्यश्रीसोबत कोणताही संपर्क होत नसल्याचं पाहून तिच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एक दिवस भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज (Pune Crime News) आला. मेसेजमध्ये "तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपये द्यावे लागतील" असं लिहिलेलं होतं. ज्या नंबरवरून मेसेज आला होता. त्याचा पोलिसांनी शोध घेतला. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Pune Crime
Crime News: पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे; नंतर गुगलवर सर्च केलं बायको मृत्यूचे फायदे काय?

ज्या दिवशी भाग्यश्रीचं अपहरण झालं, त्याच दिवशी तिचा खून करण्यात आल्याची कबुली त्याने दिली. त्यानी तिचा मृतदेह पुण्याजवळ असलेल्या सुपा गावात पुरला असल्याची माहिती दिली. आरोपींना पैशांची (crime) गरज होती. कारण सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते. यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तापसतून समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलिसांचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ (killed) उडाली आहे. पैशांसाठी मित्रांनी मैत्रिणीचाच बळी घेतल्याचं दिसतंय.

Pune Crime
Akola Crime News: अकोल्यात चालंलय तरी काय? कारागृह निरीक्षकाला कॉलर पकडून बंदुकीनं उडवण्याची धमकी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com