Crime News: पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे; नंतर गुगलवर सर्च केलं बायको मृत्यूचे फायदे काय?

UK Wife Killing Case: ब्रिटनमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलाय. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केला, त्यानंतर तिचे २०० तुकडे केले, त्यानंतर गुगलवर बायकोच्या मृत्यूने काय फायदे होतात याचा शोध घेतला.
UK Wife killing Case
UK Wife killing CaseX

United Kingdom Crime News:

ब्रिटेनमधील एका २८ वर्षीय माथेफिरू व्यक्तीने पत्नीचा खून करत तिच्या शरिराचे २०० पेक्षा जास्त तुकडे केले. त्या तुकड्यांना एक आठवड्यापर्यंत स्वयंपाक घरात ठेवलं. त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीच्या मृतदेह नदीत फेकला. सुरुवातीला या आरोपी पतीने पत्नीचा खून केल्याचं कबूल केलं नाही. मार्च महिन्यात त्याने आपणच आपल्या पत्नीचा खून केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक केलीय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ब्रिटनमध्ये घडली. मारेकरी पतीचं नाव निकोलस मेटसन आहे. तर मृत पत्नीचं नाव होली ब्रॅमली असं आहे. याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटसनने आपल्या पत्नीचा खून बेडरूममध्ये केला असावा. तिच्यावर अनेकवेळा चाकूचे वार केले. त्यानंतर बाथरुमध्ये नेत पत्नीच्या शरिराचे २०० तुकडे केले. ते सर्व तुकडे प्लास्टिक पिवशीत भरले. या बॅग्स त्याने स्वयंपाक घरातील फ्रिजमध्ये ठेवल्या. एका आठवडाभर त्याने ते तुकडे स्वयंपाक घरात ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने ‘माझी पत्नी मेली तर मला काय फायदा होईल’, ‘मेल्यानंतर मला कोणी त्रास देईल का?’ असे प्रश्नाची उत्तर त्याने गुगलवर शोधल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. मेटसन होलीला आपल्या घरच्याना भेटू देत नव्हता. त्यामुळे होलीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याआधीच त्याने तिचा जीव घेतला असल्याचं होलीच्या आईने न्यायालयात सांगितलं.

आरोपी निकोलस मेटसन आणि ब्रॅमलीचं लग्न १६ महिन्यापूर्वी झालं होतं. होली मेटसनपासून विभक्त होणार होती. परंतु त्याआधीच मेटसनने तिचा जीव घेतला. पत्नीचा खून केल्यानंतर मेटसनने मृत शरिराचे तुकडे भरण्यासाठी ऑनलाईनने प्लास्टिक पिशव्या विकत घेतल्या. मेटसन हा मानसीक रुग्ण असल्यासारखं वागत होता. त्याला कधी पत्नी होलीला त्रास द्यायचा असेल त्यावेळी तो तिच्या पाळीव प्राण्यांना मारुन टाकत होता. होलीने एक उंदीर पाळला होता. मेटसनने त्याला मायक्रोवेव्हमध्ये टाकून मारले होते. तसेच, मेटसन एकदा होलीने पाळलेला ससा मारण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी होलीने पोलीस ठाणे गाठले.

मिळालेल्या माहितीनुसार, होलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी होलीचा शोध सुरू केला. पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती झाली तेव्हा त्यांनी मेटसनची चौकशी केली. त्यावेळी मेटसनने पोलिसांना चकवा दिला. त्याने सांगितलं की माझ्या पत्नीने मला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. त्याने पोलिसांना त्याच्या शरिरावर झालेल्या जखमा दाखवल्या. पोलिसांच्या मते होलीने तिच्या आत्मरक्षणासाठी मेटसनवर हल्ला केला केला असेल.

UK Wife killing Case
Crime News: मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com