Crime News: मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Physically Abused Friend: बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
Crime News
Crime NewsYandex

संजय जाधव साम टीव्ही, बुलढाणा

Buldhana Crime News

बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ ( Bhendwal) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राचा मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय घटना (Buldhana Crime News) आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवकावर त्याच्या २७ वर्षीय मित्रानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. (Latest Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद (Jalgaon Jamod Taluka) तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील २३ वर्षीय युवकावर त्याचा २७ वर्ष मित्र मागील एक वर्षापासून (Buldhana Crime) अनैसर्गिक अत्याचार करत आहे. पीडित तरूणाने त्याचा मित्र भगवान प्रमोद वाघ याच्या विरोधात बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेतील तक्रारदार आणि आरोपी दोघेही चांगले मित्र आहेत. आरोपीवर वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत आहे. वारंवार केलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून तक्रारदार युवकाने अखेर (Crime News) विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Crime News
Crime News: आधी लव्ह मॅरेज मग दुसरं लग्न, अडथळा ठरणाऱ्या बायको आणि मुलाला संपवलं; आग्र्यात दुहेरी हत्याकांड

सध्या पीडित तरूण अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी याप्रकरणी (Physically Abused Friend) आरोपी भगवान प्रमोद वाघ यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक २०४/२०२४ कलम ३७७ सहकलम अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला (crime) आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मित्रानेच असं पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसत आहे.

Crime News
Bhusawal crime : आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला; रेल्वे स्थानकावर नवीन स्टॉलवरून झालेला वाद सोडविताना हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com