Bhusawal crime : आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला; रेल्वे स्थानकावर नवीन स्टॉलवरून झालेला वाद सोडविताना हल्ला

Jalgaon News : दोन्ही गटांचे सुमारे १५० जणांना आरपीएफ व जीआरपी यांनी वाद सोडवून शांत केले व मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
Bhusawal railway Station
Bhusawal railway StationSaam tv
Published On

भुसावळ (जळगाव) : भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले. (Bhusawal) या नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या रेल्वे आरपीएफ कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने (Railway) रेल्वे लोहमार्ग ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Bhusawal railway Station
Ashok Chavan News : काँग्रेस सोडून भाजपात गेले, तेव्हा काय केलं; अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंना सवाल

रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलिस निरीक्षक राधा किशन मीना, ए. ओ. गोपाल, लाल मीना हे २ मार्चला कर्तव्यावर मुख्य पार्सल कार्यालय, भुसावळ येथे हजर होते. याचवेळी भुसावळ रेल्वे स्टेशनवरील फलाट पाचच्या जळगाव (Jalgaon) बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले होते. या ठिकाणी नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. आरपीएफ (RPF) निरीक्षक मीना यांनी या घटनेबाबत लोहमार्ग ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांना माहिती दिली व तत्काळ पथकास पाठविण्यास सांगितले.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhusawal railway Station
Fraud Case : दहा लाखाच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत फसवणूक; रक्कम तीन पट करण्याचे दिले आमिष

घटनास्थळी पथक पोहचले असता एम. आर. इंटरप्राइजेसचे सुपरवायझर अफसर रफिक मेमन, रियाज अब्दुल मोहम्मद रेहमान, शेख कलिमोद्दीन शेख अलिमोद्दीन, शेख नदीम नथ्थू बागवान तसेच मद्रास बेकरीचे सय्यद हमीद सय्यद कासीम, रईस सद्दाम बागवान (रईस पहिलवान), सय्यद कासीम सय्यद हमीद, शेख इरफान शेख चाँद तथा दोन्ही गटांचे सुमारे १५० जणांना आरपीएफ व जीआरपी यांनी वाद सोडवून शांत केले व मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान काही जणांनी आरपीएफ कर्मचारी महेंद्र कुशवाह यांच्यावर अचानक हल्ला केला व फिर्यादीला धक्काबुक्की करून कॉलर पकडून हाताने व लाथाने मारहाण करून चेहऱ्यावर गंभीर जखमी केले. या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अकरा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com