पिंपरी चिंचवड : काही वेळातच तीन पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयाच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत फसवणूक (Fraud) करण्यात आली. या प्रकारात पिंपरी चिंचवड शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)
शुभम भगवान सोनवणे असं फसवणूक झालेल्या हॉटेल व्यवसायिकाची नाव आहे. आकाश शेट्टी, सचिन नरवडे, तुषार टेके आणि (Pimpri Chinchwad) त्याच्या सोबतच्या दोन मित्रांनी शुभम सोनवणे या हॉटेल व्यावसायिकांची जवळपास दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तुला आम्ही अगदी काही दिवसांत तिन पट नफा मिळवून देतो; असं आमिष दाखवत आरोपींनी हॉटेल व्यवसायिक शुभम सोनवणे याची फसवणूक केली आहे. शुभम सोनवणे यांनी जेव्हा आरोपींकडे पैसे नफ्यासोबत परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला जवळपास दहा लाख रुपयांच्या चिल्ड्रन बँकेच्या खोट्या नोटा परत दिल्या आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोन आरोपी ताब्यात
नोटा भरलेली बॅग शुभम सोनवणे घरी गेल्यानंतर मोजू लागला. यावेळी त्याच्या लक्षात आलं की आरोपींनी त्याला चिल्ड्रन बँक खोट्या चलनी नोटा देऊन त्याची फसवणूक केली आहे. त्यानंतर शुभम सोनवणे यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. निगडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना बेड्या ठोकले आहेत. तर उर्वरित आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.