Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Nagpur Crime News in Marathi : नागपुरतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात सिगारेट ओढण्यावरून वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Nagpur newsSaam tv

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur News in Marathi :

नागपुरतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात सिगारेट ओढण्यावरून वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिगारेट ओढण्यावरून वाद झाला. तरुणीने सिगारेटचा धूर शेजारी उभा असलेल्या तरुणाच्या तोंडावर सोडल्याने वाद झाला. त्यानंतर आरोपी तरुणी आणि तिच्या मित्रांनी या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत २८ वर्षीय रणजित राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी जयश्री पानझरे, सविता सायरे, आकाश राऊत या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Crime News: पुणे हादरलं! कर्जबाजारी तरुणांनी मैत्रिणीचं अपहरण करून केला खून; मृतदेह जाळुन पुरला शेतात

नेमकं काय घडलं?

रणजित राठोड या तरुणाचं कपड्याचे दुकान आहे. रणजीत आणि जयश्री या दोघांनी पानटपरीवरून सिगारेट खरेदी केली. जयश्रीने सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. जयश्रीने सिगारेट ओढताना रणजितच्या तोंडावर धूर सोडला. यांवरून दोघांमध्ये वाद झाला.

त्यानंतर जयश्री आणि तिची मैत्रीण सविताने रणजीतला शिवीगाळ केली. त्यानंतर जयश्रीने तिच्या आणखी मित्रांना फोन करून बोलावलं. जयश्री आणि तिच्या मित्रांनी मिळून रणजीतला मारहाण केली. या घटनेत सर्वांनी मिळून २८ वर्षीय रणजीतवर जीवघेणा हल्ला केला. जयश्री शिवीगाळ करताना रणजितने व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला होता.

Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Crime News: खळबळजनक! भरवस्तीत झालेल्या गोळीबाराने बुलढाणा, नाशिक हादरलं

या हल्ल्यात जखमी झालेल्या रणजीतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रणजीतचा मृत्यू झाला. रणजीतच्या मृत्यूने नागपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील पीडित रणजीतच्या मृत्यूने तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. तर २८ वर्षीय रणजीतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com