Crime News: खळबळजनक! भरवस्तीत झालेल्या गोळीबाराने बुलढाणा, नाशिक हादरलं

Crime News: बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली असून मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांकडून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime News

संजय जाधव, बुलढाणा|ता. ८ एप्रिल २०२४

Buldhana Crime News:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. अशातच बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली असून मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांकडून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

समोर आलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात तीन चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच चोऱ्यांच प्रमाण वाढत असताना आता चक्क तीन चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात पळ काढला.

मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एक चोराने चक्क हवेत एक गोळी चालविली. तसेच एका रिक्षात बसून चोरटे पसार झाले. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून मलकापूर पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत. हे चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.

Buldhana Crime News
Sujay Vikhe Patil : किती घालायच्या तेवढ्या गोळ्या घाला, मागे हटणार नाही; जीवे मारण्याची धमकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया

नाशिकमध्ये भरवस्तीत गोळीबार..

नाशिकच्या (Nashik) सिडको परिसरात भरवस्तीत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. रात्री अकरा वाजायच्या सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरात तलवारी नाचवत टोळक्याने गोळीबार केला असून टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Crime News
Eknath Khadse Jalgaon : एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे! ताकद नेमकी किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com