रचना भोंडवे
"मी भाजपात प्रवेश करणार" अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पक्षप्रवेशाच्या चर्चा खऱ्या ठरल्यात. पुढील १५ दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिलीय. २१ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर भाजपाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. (Latest News)
हा तर झाला इतिहास... आता खडसेंची घर वापसी होणार हे निश्चित झालंय. आता खडसे परत का जाताय. ते भाजपात गेल्याने कोणाला फायदा होणार आहे. एकनाथ खडसे यांची जळगाव किती ताकद आहे, त्याचा फायदा होणार का अशा प्रश्नांनी अनेकांनाच्या मनात कल्लोळ माजवला असेल. तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखात देणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जळगावमध्ये खडसेंची ताकद नेमकी किती? एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाने भाजपला नेमका काय फायदा होणार? यात सगळ्यात महत्त्वाचं आहे एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे. ते टप्पे नेमके काय आहेत?
एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे
1988 - कोथळी गावचे सरपंच
1989 - मुक्ताईनगरचे आमदार
1997 - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री
2009 - विरोधी पक्षनेतेपदी निवड
2014 - भाजप सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री
2016 - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा
2020 - भारतीय जनता पार्टी सोडली
2020 - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश
2022 - विधान परिषद सदस्य
एकनाथ खडसेंच्या या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर जर नजर टाकली तर एकूणच त्यांची मतदारसंघातील ताकद काय असेल हे लक्षात येतं.
उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. जळगावातून उन्मेष पाटील जे की आता ठाकरे गटात गेलेत हा भाग वेगळा...दुसरा खासदार रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे. पण, भाजपाच्या याच यशामागे खडसेंचंही योगदान राहिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी जळगावात भाजपाचं काहीच स्थान नव्हतं, त्यावेळी भाजपाला तळागाळापर्यंत पोहचवण्याचं महत्त्वाचं काम एकनाथ खडसेंनी केलंय. त्यामुळे एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातलं एक प्रतिष्ठित नाव आहे. एकनाथ खडसेंचा भाजपाच्या पक्षबांधणीत मोठा वाटा आहे.
बरं २००९ ते २०१४ दरम्यान खडसे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे २०१४ साली त्यांचंच नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. पण इथे फडणवीसांनी बाजी मारली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. तर, खडसे राज्याचे महसूलमंत्री झाले. एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडेंनंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिलं जातं.
यापूर्वी खडसे भाजपात असताना त्यांचा दूध संघ, जिल्हा बँक आणि बाजार समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांची पत्नी मंदा खडसे या दूध संघाच्या माजी अध्यक्षा होत्या. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या जिल्हा बँकेत माजी अध्यक्षा होत्या. मात्र खडसेंनी भाजपला सोडलं आणि खडसेंना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलीच किंमत मोजावी लागली.
हातातून दूध संघही गेला होता आणि जिल्हा बँकही...इतकचं काय.. तर त्यांना ग्रामपंचायतही टिकवता आली नव्हती. त्यामुळे आता खडसे भाजपात आले तर...खडसेंचे अच्छे दिन येण्याची शक्यताय असा टोलाही विरोधक लगावतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.