Maharashatra Election: पंकजा मुंडे, जानकरांचं नाव घेत अंधारेंनी परत उजेडात आणला भाजपचा अंतर्गत वाद

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी मुंडे, जानकर यांचे नाव घेत थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. अंधारे यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या जुन्या जखमा कोरल्यामुळे नेत्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maharashatra Election Sushma Andhare
Maharashatra Election Sushma Andhare saam tv

(गिरीश कांबळे, मुंबई)

Maharashtra Loksabha election Sushma Andhare Target Devendra Fadnavis :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरलाय. राज्यात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरूय. शिंदे गट जागावाटपावरून आक्रमक झालाय. तर भाजपने आपल्या पक्षांतील नेत्यांची मनधरणी करत सर्वांना सोबत घेऊन प्रचारात उतरण्याची योजना आखलीय. त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपमधील जुना वाद परत एकदा उजेडात आणलाय. (Latest News)

पंकजा मुंडे, विनोद तावडे, आणि महादेव जानकर यांचे नाव घेत सुषमा अंधारे यांनी भाजपचा अंतर्गत वाद समोर आणल्याने भाजपच्या प्रचाराची वारा बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचे फासे जवळपास योग्य पडत आहेत. जागावाटप असो किंवा नेत्यांची तोडाफोडी असो. पण फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय समितीतून चीतपट केलं जात असल्याचं विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडे यांनी चीतपट केल्याचा गौप्यस्फोट सुषमा अंधारेंनी केलाय. तिकीट देण्यावरून आणि भाजपमध्ये होणाऱ्या घडामोडीवरून आपल्याला फडणवीस यांचा चीतपट केलं जात असल्याचं वाटतंय. एकेकाळी विनोद तावडे यांचं विधानसभेचे तिकीट कापलं त्या तावडेंची महाराष्ट्रात जोरदार कमबॅक करण्याची ही तयारी सुरू झालीये का, असं म्हणायला वाव आहे, असं अंधारे म्हणालेत.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे

गेली 5-7 वर्षे पंकजा मुंडे यांना राजकीय वनवास पत्करावा लागला होता, त्या पंकजा मुंडे यांची दमदार एंट्री करत त्यांना लोकसभेची उमेदवारी देणं. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय जानकर यांना परभणीतून उमेदवारी देणं. पुण्यात फडणवीसांचे निकटवर्तीय जगदीश मुळूक यांची लोकसभा उमेदवारी हुकणं. इकडे जळगावमध्ये फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांना धक्का देत, त्यांच्या मनाविरुद्ध उमेदवारी देणं. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना दोन दोन दिवस वेटिंग करायला लागणं, मात्र नवनीत राणा यांना एका तासात भेट करायला लावणं.

हा सगळा जर घटनाक्रम पाहिला तर राज्याच्या राजकारणातला भाजपचा सत्ताकेंद्र जो फडणवीसांच्या हातात होता तो केंद्रबिंदू केंद्रातल्या विनोद तावडेंकडे सरकत आहे का? हे म्हणायला पुरेसा वाव आहे. किरीट सोमय्या यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना स्पष्टपणे सांगितलं की माझी इच्छा नव्हती उद्धव ठाकरे मातोश्रीवर आरोप करण्याची; मात्र तसे आरोप करायला फडणवीसांनी भाग पाडलं. हे एका अर्थाने फडणवीसांना व्हिलन ठरवण्याची धमक सोमय्या यांनी करणं. हा सगळा क्रम पाहिला तर यामागे तावडे यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

सुषमा अंधारे यांनी मुंडे, जानकर यांचे नाव घेत थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. अंधारे यांनी राज्याती भाजप नेत्यांच्या जुन्या जखमा कोरल्यामुळे नेत्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अंधारे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय होता भाजपचा अंतर्गत वाद

राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे विनोद तावडे राज्यातून दिल्लीत पक्षाच्या कारभारासाठी गेलेत. तर बीडमधील ओबीसी समाजाचा आवाज आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांना फडणवीस यांनीचा बाजुला सारण्याचं काम केल्याचं म्हटलं जातं. मागील विधानसभेत त्यांचा पराभव होणे, त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारीत डच्चू देणं, त्यांच्या कारखान्यावर कारवाई होणं यात फडणवीस यांचा संबंध असल्याचं म्हटलं जातं.

Maharashatra Election Sushma Andhare
Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतल्यास कुणाला फायदा होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com