Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतल्यास कुणाला फायदा होणार?

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आलाय. त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Eknath Khadse News
Eknath Khadse NewsSaam Tv

>> मयूर सावंत

Eknath Khadse News:

एकनाथ खडसेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आलाय. त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे एकनाथ खडसे आता भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण खडसे भाजपमध्ये परतल्यास कुणाला फायदा होणार? असा प्रश्न आता सगळ्यांचा पडलाय.

एकनाथ खडसेंनी तीन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मला भाजपमध्ये जायचे असेल तर इतरांची आवश्यकता नाही, असं सूचक वक्तव्यही खडसेंनी केलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Khadse News
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंचं ठरलं! शरद पवारांचे आभार मानले; भाजप प्रवेशाचा मुहूर्त अन् ठिकाणही सांगितलं

एकनाथ खडसे भाजपात स्वगृही परतले तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघाला त्यांचा फायदा होऊ शकतो. तो कसा? कारण उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा आणि एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत खडसे गेमचेंजर ठरू शकतात, असं जाणकार सांगतात.

यापूर्वी खडसे भाजपमध्ये असताना त्यांचा दूध संघ, जिल्हा बँक आणि बाजार समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांवर चांगलाच प्रभाव होता. त्यांची पत्नी मंदा खडसे या दूध संघाच्या माजी अध्यक्षा होत्या. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या जिल्हा बँकेत माजी अध्यक्षा होत्या. मात्र खडसेंनी भाजपला सोडलं आणि खडसेंना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलीच किंमत मोजावी लागली. हातातून दूध संघही गेला आणि जिल्हा बँकही...इतकचं काय.. तर त्यांना ग्रामपंचायतही टिकवता आली नव्हती. पण आता जर ते भाजपत आले तर..खडसेंचे इच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse News
Sanjay Singh: केजरीवालांना फसवण्यात आलं, खरा मद्य घोटाळा भाजपने केला, संजय सिंह यांचा गंभीर आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण शरद पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याचे खडसेंनी जाहीर केले होते. पण रक्षा खडसेंना भाजपने उमेदवारी घोषित केली आणि खडसेंनी प्रकृतीचं कारण देत माघार घेतली होती. अशातच खडसेंवर भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्याचे आरोप लावण्यात आले होते. यासह त्यांच्या जावयाला देखील एका प्रकरणात जेलवारी करावी लागली. पण आता खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये गेले तर त्यांना या सर्व गोष्टींतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसेंना भाजपचा फायदा होईल की, भाजपला खडसेंचा फायदा होईल? हे आता येणारं काळच ठरवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com