Eknath Khadse News: एकनाथ खडसेंचं ठरलं! शरद पवारांचे आभार मानले; भाजप प्रवेशाचा मुहूर्त अन् ठिकाणही सांगितलं

Maharashtra Politics News: चंद्रपूरच्या सभेत वगेरे माझा प्रवेश नाही, दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल," असे एकनाथ खडसे म्हणालेत.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

Eknath Khadse On Joining BJP:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार नसल्याचे विरोधक सांगत आहेत. यावर आता स्वतः एकनाथ खडसे यांनी महत्वाचा खुलासा केला असून मी भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

"भारतीय जनता पक्षाचे केंद्रिय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसात प्रवेश व्हावा, असा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगेरे माझा प्रवेश नाही, दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल," असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणालेत.

तसेच "भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न नव्हता. मात्र जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मी भाजपमध्ये असावे अशी चर्चा होती. गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा होत्या. त्यानुसार आता मी हा निर्णय घेतला, असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) संकटात मदत केली त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे," अशी भावूक प्रतिक्रियाही एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली.

Eknath Khadse
Shirur Loksabha Election: शिरुरमध्ये महायुतीला धक्का! अतुल देशमुखांचा भाजपला रामराम

घरवापसीसाठी खडसेंसमोर खडतर अटी?

दरम्यान, एकनाथ खडसे यांना घरवापसी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काही अटी घातल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा तसेच रोहिणी खडसे यांनीही भाजपमध्ये यावं, अशी अट घातल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खडसेंनी अशी कोणतीही अट घातली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com